ताज्या घडामोडी

प्रशांत डवले यांच्या नेतृत्वात विदर्भ राज्य आंदोलन समिती चिमूर तर्फे रास्ता रोको आंदोलन

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समिती चिमूरच्या वतीने प्रशांत डवले यांच्या नेतृत्वात नवीन बसस्थानक, तहसील कार्यालय समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
कोरोना काळातील वीज बिल कमी करण्यात यावे, २०० युनिट वीज बिल नियमितपणे मोफत देण्यात यावे, शेतकऱ्यांना शेतीकरीता मोटर पंप चालविण्यासाठी वीज पुरवठा नियमित
करण्यात यावे. पेट्रोल-डीझेल व गॅस दरवाढ कमी करण्यात यावे, साप चाऊन मरणाऱ्या व्यक्तीला जीवितहानी मोबदला देण्यात यावा याकरिता केंद्र शासन तसेच राज्य शासन यांचे निषेधार्थ रस्ता रोको व जेल भरो आंदोलन चिमूर शहरात करण्यात आले.
जनहितांच्या मागण्या लक्षात घेता आपण आपल्या स्तरावरून आमच्या मागण्यांविषयी सकारात्मक विचार करून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा आंदोलनाचे रुद्ररूप निर्माण होऊन आपल्या हक्कासाठी व न्यायासाठी जनता आपल्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे माजी राज्यमंत्री डॉ.रमेश गजभे यांनी आपल्या भाषणात बोलतांना सांगितले, व विदर्भ राज्य आंदोलन समिती चिमूर तर्फे तहसील कार्यालय चिमूर येथे विविध मागान्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री डॉ.रमेश गजभे , प्रशांत डवले अध्यक्ष विदर्भ राज्य समिती चिमुर , सचिव आदित्य पिसे , प्रविण निशाने , डॉ .हेमंत इसनकर , सुरज तितरे ,प्रिती दिडमुळे अध्यक्ष दक्षिण नागपुर,शितल सोरदे,सुनिल अरिडोर, रामकृष्ण लाले,अधिनाथ चांदेकर,प्रा.संजय पिटाळे, परशुराम, जैराम पोहीनकर,प्रकाश पारिमल व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close