स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळवून भद्रावतीच्या शिरपेचात संकेत माथनकर चा मानाचा तुरा!
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती ऐतिहासिक नगरीतील वास्तव्यास असलेल्या संकेत संजय माथनकर यांनी (एमपीएससी) स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य सिव्हिल सर्विस अभियांत्रिकी 2019 च्या स्पर्धा परीक्षेमध्ये जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी-2 पदाच्या परीक्षेत प्राविण्य मिळवीत. भद्रावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा मिळवला आहे. संकेत चे वडील जिल्हा परिषद मध्ये पदवीधर शिक्षक असून आई गृहिणी आहे. संकेतचे लहान बंधू अनिकेतने नुकतेच जागतिक पातळीवर दुबई येथे कलेच्या संदर्भात स्पर्धेत भारताचे नेतृत्व करीत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले असून विविध पुरस्कार व सन्मान प्राप्त करून चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचविले व त्याचबरोबर त्यांचे ज्येष्ठ बंधू संकेत माथनकर यांनी पुणे येथे 2019 मध्ये स्पर्धापरीक्षेची तयारी करून, मुख्य परीक्षा 24 नोव्हेंबर 2019 दिली होती .स्पर्धा परीक्षेची मुलाखत 21 जानेवारी 2022 झाली आणि स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल 13 एप्रिल 2022 ला घोषित झाला. त्यात संकेत संजय माथनकर यांनी घवघवीत यश प्राप्त करीत जलसंपदा विभागातील श्रेणी-2 परीक्षा उत्तीर्ण होत. भद्रावतीच्या ऐतिहासिक शिरपेचात मानाचा तुरा प्राप्त केला आहे.
विशेष म्हणजे संकेतला क्रीडा (क्रिकेट- व्हॉलीबॉल) क्षेत्राबरोबरच कलेमध्ये आवड असून दोन्ही बंधू रवींद्र तिराणिक यांच्या कलाअकादमीचे विद्यार्थी आहेत .एकाच परिवारातील दोन मुलांनी भद्रावती चे नाव उज्वल केले असून. त्यांच्या गुणगौरवांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.