ताज्या घडामोडी

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान व पिक विमा 25 टक्के द्या

खासदार प्रीतम ताई मुंडे संसदेत बिलकिस बानो प्रकरणी आवाज उठवा:- नुमान चाऊस

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

लोकसभेत बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बीड जिल्ह्याचे खासदार माननीय श्रीमती प्रीतम ताई मुंडे हे माजलगावला आल्या असता मौलाना आझाद युवा मंच तर्फे तीन प्रमुख मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले.
सविस्तर बातमी अशी की, संपूर्ण बीड जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली व त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये 30 ते 35 दिवस पाऊस पडला नव्हता त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन पिकांची वाढ खुंटली आहे. सोयाबीनचे फुलगळ झाली आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.
काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी अनुदान यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामधून बीड जिल्ह्यांना वगळण्यात आले आहे तसेच पिक विमा खरीप 2022, 25 टक्के अग्रीम साठी जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळी व सोयाबीन सोडता सगळीच पिके वगळण्यात आली आहेत. या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी लोकसभेत बीड जिल्ह्याच्या नेतृत्व करणाऱ्या बीड जिल्ह्याचे खासदार माननीय प्रीतम ताई यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की संसदेत आणि सरकारशी बोलून हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत. बीड जिल्ह्यावर झालेल्या अन्यायला गाळून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व नागरिकांना न्याय द्यावा.
तसेच गुजरात दंगली दरम्यान शिक्षा भोगणाऱ्या अकरा लोकांना गुजरात सरकारने 15 ऑगस्ट रोजी नेहमीसाठी सोडून दिले आहे ते बलात्कार आणि खूनाचे दोषसिद्ध गुन्हेगार आहेत. त्यांनी बिलकीस बानो व तिच्या कुटुंबावर बलात्कार करून हत्या केली होती. ह्या आरोपींना सोडून बिलकीस बानोवर अन्याय झालेला आहे. तसेच गेल्या काही महिन्यात आपल्या देशात इस्लामचे प्रेषित हजरत मोहम्मद सल्लाल्लाहू अलैही व सल्लम यांच्या बद्दल अपशब्द वापरण्यात आलेले आहेत व त्यांचा अपमान करण्यात आला आहे. त्यांचा अपमान करून समाजात अशांतता निर्माण करण्याचा या समाजकंटकांचा हेतू असू शकतो म्हणून म या समाजकंटकांना लवकरात लवकर तुरुंगात टाकावे व हजरत मोहम्मद यांचा अपमान प्रतिबंधक कायदा करावा व अमलात आणावा या मागण्यांसाठी माननीय खासदारांनी संसदेत आवाज उठावा तसेच सरकारशी बोलून, पाठपुरावा करून हे मागण्या अमलात आणावे या मागण्यांचे निवेदन मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस, तालुका संघटक मौजम कुरेशी, युवक तालुका उपाध्यक्ष वाजेद युनूस शेख, युवक शहराध्यक्ष साबेर मिया कुरेशी, पत्रकार नाजेर कुरेशी सह आदींनी दिले

मौलाना आझाद युवा मंच च्या वतीने खासदार प्रीतम ताई गोपीनाथ मुंडे यांना विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close