रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन
तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी
मौजा सोमणपल्ली ता.चामोर्शी जी.गडचिरोली येथे स्व.सानु मेडपलीवार यांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ एस. पी. एल.क्रिकेट क्लब सोमणपल्ली यांच्या वतीने 11/03/2022 ला रात्रकालीन अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन थाटात करन्यात आले . कार्यक्रमाची सुरवात आद्य शिक्षिका सावित्री बाई फुले,डॉ. बाबा साहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करुन , दीपप्रज्वलन करुन क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन करण्यात आले .
त्याच ठिकाणी स्व.सानू मेडपलीवार यांना खेळपट्टीवर श्रध्दांजली वाहण्यात आली .
या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून श्री.नीलकंठ पाटील नीखाडे सरपंच ग्रमपंचायत सोमणपल्ली , तर सह उद्घाटक म्हणून वासुदेव जी देठेकर माजी सरपंच तथा सदस्य ग्राम पंचायत सोमनपल्ली उपस्थीत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.राकेश भाऊ दांडीकवार सदस्य ग्राम पंचायत कोनसरी हे उपस्थीत होते . तर सह अधक्ष म्हणून निकेश भाऊ गद्देवार उपसरपंच अड्याड हे उपस्थीत होते.
अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना श्री राकेश भाऊ दांडीकवार यांनी एक चांगला खेळाडू घडता घडता एक चांगला
समाज सेवक घडला पाहिजे ,की जो निस्वार्थ समाजसेवेचे व्रत घेतलेला असला पाहिजे.नाही तर आज प्रत्येक गावात स्वतःच्या समाजात स्वतःच अस्तिव शून्य असलेली माणसं रंग बदलणाऱ्या सरड्या सारखी झालेली आहेत . हिच रंग बदलणारी लोक समाजासाठी , गावासाठी , देशासाठी , घातक असतात . अश्या लोकांना वेळीच ओढ्खून त्यांना त्यांची जागा दाखवून दिले पाहिजे . असे मौलिक मार्ग दर्शन करुन सर्व खेळाडूना शुभेच्या दिल्या .
प्रमुख अतिथी म्हणून श्री हरिश्चद्र नेवारे , श्री विजय गाजुलवार आसाम रायफल , श्री निनाद देठेकर , श्री श्यामराव जी कुळसंगे , श्री पेश्ट्टीवार सर , श्री देवानंद पेदीवार तिरुमला मेडिकल कोनसरी, श्री जगणं जी सरवर , श्री निलेश भाऊ मडावी उपसरपंच ग्राम पंचायत सोमणपल्ली , श्री तानाजी पेदापल्लीवार , सौ मंगला ताई भेंडारे पोलीस पाटील , सौ वनिता जम्पलवार , सौ वंदना ताई ठाकरे उपस्थित होते .
उद्घघाटन समारोहाचे सूत्र संचालन श्री संदिप भाऊ नेवारे सचिव , आदिवासी गोवारी जमात संघटना तालुका चार्मोर्शी /मुलचेरा यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभार डॉ. काजल भाऊ मेश्राम यांनी मानले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस एल पी क्रिकेट क्लब चे अध्यक्ष दिनेश ठाकरे , सचिव अंकुश नेवारे , उपाधक्ष नितेश सरवर , कप्तान आदिनाथ ठाकरे , कार्यकारी अध्यक्ष पपू मेक्रतीवार , आकाश मडपते , भुमेस्वर ठाकरे , आकाश पेदापल्लिवार , योगेश ठाकरे , कपिल ठाकरे , मोहन पेदापल्ललिवार , उमाजी सरवर , खुषाब ठाकरे , देवानंद गुरूनुले , अमित बोडावर , भूपेंद्र सरवर , अतुल ठाकरे , विवेक ठाकरे , निखिल ठाकरे , प्रणय ठाकरे , आणि गावातील बहु संखेने महीला पुरुष उपस्थित राहून सहकार्य केले.