ताज्या घडामोडी

नेरी पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्याकडून मनमानी कारभार

अनेकदा कार्यालय उघडायला वाजतात 11 तर 4 वाजता बंद
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकाची पाटी गायब :
अधिकारीच करतात कनिष्ट कर्मचाऱ्यांच्या खोट्या तक्रारी : बरडे यांना कर्मचारिही त्रासले

मुख्य संपादक: कु.समिधा भैसारे

पोस्ट ऑफिस म्हटले की ग्रामीण भागाचा कणा अशी ओळख आहे मात्र ग्रामीण भागातील महत्वाचा कान चालविणारे अधिकारी मात्र स्वतःला मालक समजून बसलेले असून ग्राहकांना असभ्य वागणूक देत असतात याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार होऊ नये म्हणुन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक असलेली पाटी सुद्धा काढून ठेवण्यात आलेली आहे.
नेरी पोस्ट ऑफिस मध्ये 1 अधिकारी व 1 बहुउद्देशीय कर्मचारी आहे. सकाळी 9 वाजता पासून नागरिकांची कार्यालायकडे रेलचेल सुरू होते मात्र अनेकदा 11 वाजेपर्यंत कार्यालय सुरू होत नाही त्यामुळे नागरिकांना आल्या पाऊली परत जावे लागते. याबाबत विचारणा केली असता लिंक नाही तर येऊन मी काय करू असे उत्तर दिल्या जात आहे. त्यामुळे अश्या अधिकाऱ्यांच करायचं काय असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. कार्यालयात वेळेवर अधिकरी हजर रहात नसल्याने नागरिकांना परत जावे लागते. त्यातच नागरिकांची गर्दी झाल्यास अधिकारी लिंक नसल्याचे कारण पुढे करत गप्पा करीत बसतात तर कधी पैसे नाहीत असे उत्तर देऊन मोकळे होतात त्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत.
शासन ग्रामिण भागांसाठी विविध योजना राबवित असते मात्र सदर योजना समान्यांपर्यत पोचविणारे अधिकारी हेच शासनाच्या योजनांचा गळा घोटत आहेत. त्यामुळे अश्या कामचुकार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.

आज मी 11 वाजता आलो आहे माझी चूक झाली. आपण बातम्या लावू नका – बरडे, सब पोस्ट मास्तर नेरी

या अगोदर इतके अधिकारी आम्ही बघितले मात्र अश्या प्रकरचा कामचुकार अधिकारी आम्ही कधीच बघितलं नाही त्यामुळे त्यांचे निलंबन होणे गरजेचे आहे. – ग्राहक पोस्ट ऑफिस

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close