ताज्या घडामोडी

‘सुंदर माझा दवाखाना’ मोहिमेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

महाराष्ट्र दिनाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते जिल्ह्यातील ‘सुंदर माझा दवाखाना’ मोहिमेंतर्गंत विजेत्या आरोग्य संस्थांना पारितोषिक वितरण करण्यात आले.‘सुंदर माझा दवाखान’ या मोहिमेंतर्गंत पिंगळी, चारठाणा, राणीसावरगाव, धनेगाव, रामपुरी, पालोदी, पडेगाव, खडका, सरफारजपीर, माटेगाव, माळसोन्ना आणि अंबरवाडी येथील विजेत्या आरोग्य संस्थांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तसेच जिल्हा सूचना अधिकारी सुनील पोटेकर लिखित ‘परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा’ पुस्तकाचे विमोचन खासदार संजय जाधव आणि जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते झाले. समाजकल्याण विभागाच्या वतीने राज्य शासनाच्या विविध योजना, लाभार्थ्यांची माहिती देणाऱ्या यशोगाथा पुस्तकाचे विमोचनही यावेळी करण्यात आले. जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य प्रबंधक सुनील हट्टेकर, आदर्श तलाठी रामदास कोल्हे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार श्रीमती कल्पना दळवी आणि श्रीमती नंदाबाई जोगदंड यांना संयुक्तपणे देण्यात आला.

प्रातिनिधीक नियुक्ती आदेश प्रदान
राज्य शासनाच्या ७५ हजार पदभरती प्रक्रियेचा एक भाग म्हणून आज जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा परिषद, सहायक राज्यकर आयुक्त कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयांमधील २१ उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात पोलिस परेड कमांडर राखीव पोलिस निरीक्षक आर. बी. दामोदर आणि सेकंड इन कमांडर राखीव पोलिस निरीक्षक व्ही. आर. मुंढे यांनी परेडमध्ये भाग घेतला. तसेच पुरुष प्लाटुन कमांडर सहायक पोलिस निरीक्षक श्री. बाचेवाड, श्री. बोरकर, पोलिस उपनिरीक्षक (महिला) श्रीमती कावळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. कदम, होमगार्ड (पुरुष) बी.टी. तनपुरे, डी. आर. कुलकर्णी, जी. बी. कटारे, पी. बी. ढाके, महिला श्रीमती रंजना बोचरे आणि श्रीमती वाकळे सहभागी आदी झाले होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close