ताज्या घडामोडी

रामगिरी महाराज यति नरसिंहानंद व नितेश राणे याच्यांवर कारवाई करा

मानवत मुस्लीम समाज बांधवाची मागणी

जिल्हा पत्रकार:अहमद अन्सारी परभणी

प्रेषित मोहम्मद साहेब यांची  जाणुन बुझुन विटंबना करणाऱ्या रामगिरी , यति नरसिंहानंद सरस्वती व नितेश राणे मुस्लीम समाजाला शिविगाळ करुन मस्जिदीत घुसुन जिवे मारण्याच्या धमक्या देऊन आंतक, दहशत, निर्माण करत आहे  यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीचे निवेदन 
मा. राज्यपाल, राज भवन, महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार पाडुरंग माचेवाड साहेब तहसील कार्यालय मानवत याच्यां मार्फत दि.११ आँकटोबंर रोजी धरणे आंदोलन करुन निवेदन मानवत मुस्लीम समाज बांधवाच्या वतीने देण्यात आले आहे.
ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद साहेबांची  जाणुन बुजुन विटंबना करणाऱ्या रामगीरी व यति नरसिंहानंद सरस्वती मुस्लीम समाजाला शिविगाळ करुन व मस्जिदीत घुसुन जिवे मारण्याच्या धमक्या देऊन आतंक, दहशत निर्माण करणाऱ्या नितेश राणे यांना तात्काळ अटक करण्यात यावे व  प्रेषित मोहम्मद व इतर धर्मातील वरिष्ठांवर विटंबना होऊ
नये म्हणुन कडक कायदा बनवुन शिक्षेचा प्रावधान ठेवण्यात यावा, वक्फ संशोधन बिल २०२४ परत घेण्यात यावा वरील तिन्ही दोषी विरुध्द यु ए पी ए   अंतर्गत कडक कार्यवाही करण्यात यावी आमच्या वरील मागण्या सरकारने तात्काळ मान्य करावे या करित्ता आपल्या मार्फत मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांना हे निवेदन सादर करीत आहोत जर आमच्या मागण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले तर येणाऱ्या काळात आम्ही लोकशाही मार्गाने आमचे आंदोलन तिव्र करु व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल जर वरील तिन्ही दोषी यांना यु ए पी ए  अंतर्गत तात्काळ अटक न केल्यास येणाऱ्या शुक्रवारी दि. १८ आँकटोबंर रोजी संपुर्ण महाराष्ट्रातून रामगीरी महाराज यांचे गाव सरला बेट ता. वैजापूर जि. औरंगाबाद येथे संपूर्ण महाराष्ट्रातील व परभणी जिल्ह्यातील सर्व मुस्लिम समाज समजावून सांगण्यासाठी जाणार आहोत. तरी आपण वरील मजकूराची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदनात नमुद केले आहे.यावेळी मोठ्याप्रमाणात मुस्लीम बांधव उपस्थीत होते.
पोलीस निरीक्षक संदिप  बोरकर यांच्यां मार्गदर्शनाखाली पो.ऊ.निरीक्षक नागनाथ पाटिल ,स.पो.नि. संतोष सोनटक्के ,गोपनीय शाखेचे , हे.काँ.शेख मुखीद ,विलास मोरे ,पो.काँ.समीर पठाण व होमगार्ड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता हे धरने आंदोलन शांततेत पार पडले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close