ताज्या घडामोडी

अम्मा का टिफिन हा उपक्रम मानवी सेवेचे एक उत्तम उदाहरण – अभिनेता आकाश ठोसर

दिग्दर्शक नागराज मंजुळेंसह त्यांचे टिमने दिली चंद्रपूरातील अम्मा का टिफीन या उपक्रमाला भेट !अम्माच्या कार्याची केली सर्वांनी स्तुती !

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

विदर्भाच्या चंद्रपूर नगरीत प्रथमच आलो. येथे आल्यावर नागरिकांनी मला भरभरुन प्रेम दिल. यावेळी चंद्रपूरात सुरु असलेल्या अम्माचा टिफिन या उपक्रमाला त्यांनी भेट दिली. एक मोठे सामाजिक कार्य अम्मा का टिफिन या उपक्रमाच्या माध्यमातून नित्य सुरु असुन हा उपक्रम मानवी सेवेचे एक उत्तम उदाहरण असल्याचे मत गाजलेल्या सैराट व झुंड सिनेमाचे अभिनेता आकाश ठोसर यांनी आपल्या भेटी दरम्यान व्यक्त केले.
एका मराठी सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता आकाश ठोसर काल शुक्रवारला चंद्रपूरात आले होते. या वेळी त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी येत अम्मा का टिफिन या उपक्रमाला भेट दिली. त्यांनी या वेळी अम्माचीही भेट घेतली. त्यांचे कडून उपक्रमाची सर्व माहिती जाणुन घेतली .या भेटीवेळी अभिनेते सयाजी शिंदे, व अभिनेत्री सायली पाटील यांचीही उपस्थिती लाभली होती. आमदार किशोर जोरगेवार यांनी संपूर्ण टिमचे शाल, श्रीफळ, संविधान पुस्तक आणि माता महाकालीची मुर्ती देत स्वागत केले. गंगुबाई ऊर्फ अम्मा जोरगेवार, माता महाकाली सेवा समितीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, कॉंग्रेस सेवा दलाचे सूर्यकांत खनके आदींची या वेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्याम हेडाऊ यांनी केले.
आमदार जोरगेवार यांच्या वतीने चंद्रपूरात अम्माचा टिफिन हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. सदरहु उपक्रमा अंतर्गत गरजू नागरिकांना घरपोच भोजनाचा टिफिन पोहचविल्या जात आहे. शहरात ही अनेकांकडून या उपक्रमाचे कौतुक केल्या जात आहे. विशेष म्हणजे सदरहु उपक्रम अम्मा आणि आमदार जोरगेवार यांच्या वतीने स्वखर्चाने राबविण्यात येत आहे. दरम्यान काल शुक्रवारी सैराट हा सुप्रसिध्द सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि या सिनेमात काम केलेले अभिनेता आकाश ठोसर यांनी या उपक्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी सदरहु उपक्रमाची संपूर्ण माहिती जाणुन घेत अम्माचा टिफिन उपक्रमातील कर्मचारी व सहका-यांचीही भेट घेतली.
अम्मांनी नागराज मंजुळे यांचेशी मनमोकळेपणे गप्पा करत त्यांच्या प्रवासा बदल माहिती जाणून घेतली. यापुर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह अनेक राजकीय व समाजिक क्षेत्रातील नामवंतांनी अम्मा का टिफिन या उप्रकमाला भेट दिली आहे.हे विशेष !

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close