इफ्तार पार्टीच्या आयोजकांवर पोलीस कार्यवाही करणाऱ्या पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांची तडकाफडकी बदली

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी शहर हे हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक असून या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकमेकांचे सण मोठ्या आनंदाने साजरी करत असतात, याचाच एक भाग म्हणून रमजान महिन्यात हिंदू बांधवाकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी २५ एप्रिल रोजी शिक्षक कॉलनी येथील नगरपरिषद सभागृह मध्ये हिंदू बांधवांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते यावेळी मुस्लिम बांधवांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला होता . इफ्तार पार्टी साठी मोठया संख्येने हिंदू -मुस्लिम बांधव उपस्थित होते .दरम्यान दिनांक २५ एप्रिल रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर पोलीस निरक्षक समाधान चावरे यांनी तब्बल अडीच महिन्यानंतर 13 जुलै रोजी व निवेदकावर 7 जुलै रोजी कलम 107 अंतर्गत प्रतिबंधात्मक कार्यवाही केली तसेच इफ्तार पार्टी आयोजना संदर्भात काही व्यक्तींनी समाज माध्यमांवर आक्षेपार्य टीकाटिप्पणी केल्याचे निदर्शनास आणून देत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदकांवर संबंधित पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी संबंधित निवेदकांवर प्रतिबंधत्मक कार्यवाही केल्याचा प्रकार घडला होता .निवेदन कर्त्यावर पोलिस कार्यवाही करणे ही घटना लोकशाहीसाठी घातक असून,
विशेष म्हणजे निवेदक हे शांतता कमिटीचे सदस्य असून प्रतिष्ठित नागरिक आहेत .
पोलीस निरीक्षक चवरे यांनी केलेल्या दोन्ही कारवाया गैर कायदेशीर असल्याचे म्हणत आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संबंधित प्रकरणाची माहिती देत तक्रार मांडल्यानंतर पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांची पाथरी पोलीस ठाण्यातून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे .
प्रतिक्रिया : –
पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांची पाथरी शहरातील एकंदरीत कारकीर्द वादग्रस्त राहिले असून जातीय एकतेचा संदेश देणारा कार्यक्रम घेणाऱ्या आयोजकांवर पोलीस कार्यवाही झाल्याने पोलीसांच्या कार्यपध्दतीवर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली असुन,जातीयवादी व्यक्तींना पाठबळ देण्याचे कार्य पोलीस निरीक्षकाकडून झाल्याचे स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे .या बदलीनंतर नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे .
प्रतिक्रिया : –
“जातीय सलोखा राहावा या चांगले हेतूने इफ्तार पार्टीचे आयोजन करणाऱ्या आयोजकांसह निवेदनकर्त्यांवर बेकायदेशीरपणे पोलीस कार्यवाही करणाऱ्या वादग्रस्त पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी येत्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार असून निलंबनाची कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही .”
आ .बाबाजानी दुर्राणी