भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेतर्फे देवाडा खुर्द येथे दिव्यांग प्रबोधन कार्यक्रम संपन्न

तालुका प्रतिनिधी:कल्यानी मुनघाटे नागभीड
भारतीय क्रांतिकारी संघटना प्रणित भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना तालुका पोंभुर्णा च्या वतीने देवाडा खुर्द येथे दिव्यांग प्रबोधन कार्यक्रम भारतीय क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष डार्विन कोब्रा याचें अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
प्रथमतः विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटक विलास मोगरकार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय क्रांतिकारी संघटनेचे उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा, सावली तालुका अध्यक्ष मनोज शेंडे, पोंभुर्णा तालुका अध्यक्ष रफिक शेख, विलास सेडमाके, पाटील वाळके, संगम गेडाम उपस्थित होते. भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा यानीं संबोधन करतांना दिव्यांग बांधवांनी आपल्या हक्क अधिकारासाठी संघर्ष करावा लागेल. कोणत्याही प्रकारचे अधिकार मागल्यानी मिळत नाही तर हिसकावून घ्यावे लागते यासाठी संघटनात्मकरित्या लढा उभारणे हि आजच्या काळाची गरज आहे असे यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन अनिल सेडमाके यांनी केले. प्रास्ताविक अविनाश अलगमवार यांनी केले तर आभार विलास सेडमाके यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शारदा मोगरकार, गयाबाई भलवे, वैशाली वाळके, नवनाथ पिपरे इत्यादींनी विशेष सहकार्य केले.