सिरपूर येथील हातपंप मागील ३ महीण्यापासुन बंद

ग्रामपंचायतचे हातपंप दुरुस्ती कडे पूर्णतः दुर्लक्ष
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चिमूर तालुक्यातील नेरी पासून जवळच असलेल्या मौजा सिरपूर येथे वार्ड क्र १ मधील हातपंप नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे वार्ड क्रमांक एक मध्ये नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागते. ग्रामपंचायत शिरपूर ने या पाण्याच्या भीषण समस्याकडे लक्ष देऊन वार्डातील हातपंप दुरुस्त करून द्यावे जेणेकरून वार्डातील लोकांची पाण्यासाठी भटकंती होणार नाही. ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी समस्यांकडे ग्रामपंचायतचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. सदर बोरवेल हे अंदाजे तीन महिन्यापासून नादुरुस्त आहे. याची कल्पना ग्रामपंचायतला वेळोवेळी देऊन सुद्धा जाणून या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे पाण्याची ही समस्या सोडवावी अशी मागणी
वार्ड क्र १ वार्डातील महिलांचीआहे. हातपंप लवकरात लवकर दुरस्त करून द्यावे अशी मागणी शांता आदे ,कविता आदे ,छाया मोहुर्ले, लता निकोडे, तारा सोनुले, हीरा सुंदर सोनुले ,शोभा गावतुरे ,प्रेमिला निकोडे, लता निकोडे , येशुबाई निकोडे यांनी केलेली आहे.