ताज्या घडामोडी
अल्लाह बद्दल अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीस कठोर शासन करा : नुमान चाऊस
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील रेणाखळी येथील एका समाजकंटकाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून “अल्लाह” बद्दल अपशब्द वापरले व आक्षेपार्ह व घाणेरडी भाषा वापरून एक पोस्ट केली. ही पोस्ट अत्यंत वाईट व मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे. या पोस्टद्वारे त्या समाजकंटकाने समाजामध्ये अशांतता व तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्न केला आहे. त्याच्या विरुद्ध विविध शहर व गावात पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झालेले आहेत. तरी मौलाना आझाद युवा मंचच्या तर्फे अशी मागणी करण्यात आली की कायद्यामध्ये असलेल्या सर्व तरतुदी, कलम व ऍक्ट वापरून त्या समाजकंटकाविरुद्ध फौजदारी खटला शीघ्र गतीने चालवावा व त्या समाजकंटकास कठोर कायदेशीर शिक्षा व्हावी याची खात्री शासनाने घ्यावी.