HSC गुणाधारीत वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश द्यावा -महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस एन.एस.यु. आय. ची मागणी
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
परभणी :- HSC गुणाधारीत वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस एन.एस.यु. आय. च्या वतीने करण्यात आली
परभणी : देशभरात वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी NEET परिक्षेचे आयोजन केले जाते. परंतु देशभरात दिवसेंदिवस परिक्षे संदर्भात गैरप्रकार होत असल्याचे आढळून येत आहे. राज्य परिक्षा मंडळ व इतर शैक्षणिक अभ्यासक्रम यांच्यात तफावत आहे. परिक्षा NCRT च्या धर्तीवर असल्याने राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थी पाठीमागे पडत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन महागडे कोचिंग क्लास लावणे परवडत नाही त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थींचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न धुळीस मिळत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने तमिळनाडू राज्याप्रमाणे निर्णय घ्यावा. या सर्व बाबींचा विचार करून HSC गुणाधारीत वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश द्यावा अशी मागणीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस एन.एस.यु. आय. चे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा मराठवाडा समन्वक मयुर मोरे कौसडीकर व जिल्हा उपाध्यक्ष सचिन मुंडे यांनी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिले आहे. यावेळी विशाल जोंधळे, स्वप्नील कांबळे, राजकुमार मुजमुले इत्यादी उपस्थित होते.
आपला
मयुर मोरे कौसडीकर
महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा मराठवाडा समन्वक
महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस एन.एस.यु. आय., परभणी