पाथरी येथे अग्निशामक दल जवान,भारतीय सेना जवान,पोलीस व लाईनमन यांचा रक्षाबंधन कृतज्ञात सोहळा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 21/08/2021 रोजी श्रीमती शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने “सन्मान शौर्याचा”जनसामान्यांच्या रक्षणार्थ अहोरात्र स्वतःच्या जीवाची पर्वा नकरता बंधू रुपात कार्यरत असणाऱ्या अग्निशामक दल जवान,भारतीय सेना जवान,पोलीस व लाईनमन यांचा “रक्षाबंधन कृतज्ञात सोहळा”प्रसंगी दिनेश मुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाथरी,सम्राट कोरडे पोलीस पाथरी,संजय चव्हाण पोलीस पाथरी,दीपक काळे बी.एस. एफ.जवान,शारेख पठाण फायरमँन अग्निशामक दल पाथरी,बळीराम गवळी फायरमँन अग्निशामक दल पाथरी,रवी अवचार लाईनमन व मंगेश काळे इत्यादीचा राखी बांधून सन्मान करण्यात आला,या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.भावनाताई नखाते अध्यक्षा परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सौ.मीराताई सरोदे विधानसभा अध्यक्षा पाथरी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सौ.रेखाताई मनेरे शहराध्यक्षा पाथरी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,प्रमुख पाहुणे दिनेश मुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक पाथरी व महिला पदाधिकारी दिसत आहेत.