रूढी येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत : तालुक्यातील रुढी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पुढील दोन वर्षाकरिता शालेय व्यवस्थापन समितीची निवड खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आली.
समितीच्या अध्यक्षपदी विष्णू पांडुरंग होंडे यांची तर उपाध्यक्षपदी सुरेश तुकाराम होंडे यांची एकमताने निवड करण्यात आली !
इतर पुरुष सदस्यांमध्ये काशिनाथ अंकुश पतंगे , नामदेव शिवाजी मोगरे आणि विश्वनाथ रामभाऊ होंडे यांची निवड करण्यात आली .
निवडलेल्या 12 सदस्यांमध्ये एकूण सहा महिला सदस्य निवडून त्यांना मानाचे स्थान मिळवून देण्यात आले आहे . त्यामध्ये शिवकन्या भागवत होंडे , राधा लक्ष्मण निर्वळ , शामबाला बालाजी होंडे , आसेफा सिकंदर शेख , शिल्पा ज्ञानेश्वर बोंबले , वर्षा राजेंद्र मुळे यांची निवड झाली .
नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक बाळू घनचक्कर , केंद्रप्रमुख उमाकांत हाडोळे आणि सर्व शिक्षकाकडून करण्यात आला . यावेळी मोठ्या संख्येने शिक्षण प्रेमी नागरिक आणि सर्व पालक उपस्थित होते .
रुढी येथील जिल्हा परिषद शाळेच्या सर्व उपक्रमात सक्रिय सहभागी होऊन तन , मन आणि धनाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय समोर ठेवून कार्य करण्याचा संकल्प शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आला.