ताज्या घडामोडी
ह.टिपू सुलतान चौक चे शुशोभिकरण अंतिम टप्प्यात
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत येथील हजरत टिपू सुलतान चौकाचे सुशोभिकरण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ह.टिपु सुलतान चाहत्याची मागणी होती.
या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करून माजी नगरसेवक सय्यद जमील यांनी चौकाचे सुशोभिकरण करण्यासाठी निधी आणला व हजरत टिपू सुलतान चौकाचे सुशोभिकरण करण्याचे काम सुरू केले व हे काम अंतिम टप्प्यात आले…
असून काही दिवसातच पुणे येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार यांच्या हस्ते भव्यदिव्य तोफ तयार केली आहे….
तोफ हे पूर्णपणे तयार असून फक्त कलर करण्याचे काम राहिले आहे..
चौक ची शोभा वाढविण्याकरिता पाण्याचे कारंजे ही लावण्यात येणार आहे….
अशी माहिती माजी नगरसेवक सय्यद जमील यांनी दिली आहे….
यामुळे हजरत टिपू सुलतान प्रेमी मधून समाधान व्यक्त होत आहे…..