स्वच्छता, वृक्ष लागवड आणि हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी व्हा – सीईओ शिवानंद टाकसाळे यांचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
चांगल्या आरोग्यासाठी शौचालयाचा नियमित वापर, निसर्गाच्या समतोलासाठी वृक्षांची लागवड आणि देशाच्या सन्मानासाठी हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले.
बुधवार दि 3 ऑगस्ट 2022 रोजी पाथरी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय रेणापूर मार्फत घनवन वृक्ष लागवड अंतर्गत ज्ञानोपासक विद्यालय रेणापूर येथे 3000 वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
मार्गदर्शन करताना टाकसाळे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी होऊन प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकावा, उघडयावर शौचास बसणे आणि नियमित हात न धुणे म्हणजे रोगांना आमंत्रण देने होय. त्यामुळे आपल्या आरोग्याची हानी टाळण्यासाठी शौचालयाचा नियमित वापर करा. तसेच शासनाने ठरवून दिले म्हणून नाही तर बदलत्या तापमानाचा ह्रास लक्षात घेऊन स्वयंप्रेरणेने आपल्या परिसरात वृक्ष लागवड करण्याचे आवाहन शिवानंद टाकसाळे यांनी केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, गट विकास अधिकारी भाऊसाहेब खरात, जेष्ठ नेते लक्ष्मणराव टेंगसे, माजी सभापती दादासाहेब टेंगसे, सरपंच चोखोबा उजगरे, पोहेटाकळीचे सरपंच श्यामराव गोंगे, संदिप भैया टेंगसे, स्वच्छ भारत मिशनचे संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड, उपसरपंच सर्व ग्रा.प.सदस्य, सोसायटी चेअरमन सर्व सदस्य ग्रामसेवक संदीपान घुंबरे, मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका सर्व गावकरी नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रतिक्रीया :- गाव विकासासाठी नागरिकांनी श्रमदान, वित्तदान, वेळेचे दान सारखे पाच प्रकारचे दान करणे आवश्यक आहे. वृक्ष लागवडीसाठी युवा शक्तीने पुढाकार घेतला पाहिजे.
ओमप्रकाश यादव
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, परभणी
प्रतिक्रीया :- फळझाडांचा दैनंदिन जीवनात मोठा उपयोग होतो त्यामुळे मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याचे दायित्व शालेय विद्यार्थ्यांना दिले तर झाडांचे सरंक्षण देखील होईल.
दादासाहेब टेंगसे
माजी सभापती
जिल्हा परिषद.