ताज्या घडामोडी
चिमुकली स्पृहाचा वाढदिवस वरोरा उपजिल्हा रुग्णालयात साजरा
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
हनुमान जयंती दिनी स्नेहा स्वप्नील वंजारे यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवस वरोरा उपजिल्हा रुग्णालयात साजरा केला. स्पृहा स्वप्नील वंजारे या चिमुकलीने दुसऱ्या वर्षात पदार्पण केले आहे. वाढदिवस निमित्ताने रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी या शिवाय वंजारी परिवारातील सर्व सदस्यगणांनी या चिमुकलीला शुभेच्छा व शुभकामना दिल्या.याच निमित्ताने स्नेहभोजनचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आयोजित वाढदिवसाचा कार्यक्रम वैद्यकीय अधीक्षक डॉ .अंकुश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता.सदरहु कार्यक्रमासाठी अधिसेविका वंदना विनोद बरडे,रत्नमाला ढोले, वांढरे, स्वाति जुनारकर, मनोज कराड यांचें विशेष सहकार्य लाभले होते.