श्री गोंदोळा येथेचंद्रपूर जिल्हा कार्यकारीणी सभा व ग्रामगीताचार्य सत्कार सोहळा संपन्न
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
दिनांक 26 9 2921 ला गुरुदेव सेवा मंडळ चंद्रपूर जिल्हा कार्यकारीणी च्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा तथा २०२१ या.वर्षी ग्रामगीताचार्य झालेले चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामगीताचार्यांचा आणि जिल्ह्यातील तालुका सेवाधिकारी ,प्रचारप्रमुख, युवाप्रमुख यांची कार्यशाळा वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत तपाचरण करुन वास्तव्य केलेल्या पवित्र. श्री क्षेत्र तपोभुमी गोंदोळा येथे मा.लक्ष्मण राव गमे उपसर्संवाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली , प्रकाशमहाराज वाघ यांचे शुभ हस्ते उद्घाटन आणि प्रचार प्रमुख दामोदर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी मा श्री प्रा .अशोकराव चरडे, केंद्रीय प्रतिनिधी, मा राजुभाऊ देवतळे केंद्रीय प्रतिनिधी, मा.डॉ प्रकाश महाकाळकर साहेब शिक्षणविस्तार.अधिकारी जि.प.चंद्रपूर, चंदनलालजी शर्मा जीवनप्रचारक , विठ्ठल राव सावरकर प्रांतीय सेवाधिकारी अ.भा.गुरुदेसेवांमंडळ मोझरी , मा. गवते महाराज ,गाउत्रेमहाराज नांदेड, विनोद मालु वरोरा, डॉ अंकुश आगलावे प्रांताध्यक्ष मानवाधिकार आयोग नवी दिल्ली ,आंबोरकरसाहेब गडचिरोली, अँड, सारीका जेणेकर ,चंद्रपूर जिल्हा महिला प्रतिनिधी, गोंदोळा च्या सरपंचा प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
प्रसंंगाला धरुन मा.गाऊत्रे महाराज, प्रकाशमहाकाळकर, दामोदरपाटिल , प्रकाश महाराज वाघ,मा। उपसर्वाधिकारी लक्ष्मणरावजी गमे , अँड.सारिका जेनेकर.यांनी.यथोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात. संकल्पगीताने होउन कोरोणा काळात स्वर्ग वासी झालेले चंद्रपूर जिल्ह्यातील गुरुदेव उपासकांना श्रद्धांजली.अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. जिल्हा कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी, तालुका प्रमुख यांना नियुक्ती पत्र मान्यवरांचे हस्ते देण्यात आले. ग्रामगीता चार्य , सत्कार ,.कोविड काळात सेवादिलेल्या योद्धांचा सत्कार. तसैच मा डॉ श्री अंकुश आगलावे वरोरा यांनी केलेल्या उल्लेखनीय समाजसेवेबद्ल विशेष सत्कार करण्यात आले. भारतीय सैन्यदलात काश्मीर येथे.सेवेत असलेले मा.सचिनढोके पिजदूरा टेमुर्डा वरोरा यांनी. सैनदलात मराठी हिंदी ग्रामगीता सैनिकांना वाटप करुन.महाराज च्या वांङमयाचा प्रचार ,प्रसार केला यांचा ही विशेष सत्कार.करण्यात. आले..अध्यक्षीय भाषण आभारप्रदर्शन ,राष्ट्र वंदना ,व. वनभोजनाने. कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे आयोजन मा रुपलालजी कावळे सेवाधिकारी चंद्रपूर जिल्हा मा डाँक्टर शामजी हटवादे ,जिल्हा उपसेवाधिकारी , श्री विठ्ठल राव सावलकर ,मा ऍड जेणेकर ताई जिल्हा सेवाधिकारी महिला , मा प्रा राम राऊत जिल्हा संघटक ,मा नत्थुजी भोयर तालुका सेवाधिकारी चिमुर तसेच सर्व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य यांनी आयोजित केला होता .चिमुर तालूूकासेवाधिकारी व त्यांचे प्रतिनिधी व सहकारी यांनी यश्वस्वीकरण्यासाठी अथक प्रयत्न केलै. गोंदोळा समिती यांनी.संपुर्ण कार्याची धुरा सांभाळली.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा वाढई सर यांनी केले या कार्यक्रमात जिल्हा महिला कार्यकारिणी मा ऍड जेणेकर मॅडम यांनी घोषीत केली
या कार्यक्रमात संपूर्ण चंद्रपूर जिल्यातून आजीवन प्रचारक ,जीवन प्रचारक ,मध्यवर्ती प्रतिनिधी , तालुका प्रतिनिधी , जिल्ह्यातील उपासक कौरोना नियमाचे पालन करुन बहुसंखेने उपस्थित होते या कार्यक्रमाला परिसरातील गुरुदेव सेवकांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला
या सर्व कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मा प्रा राम राऊत सर यांनी मानले .