जनशक्ती शेतकरी संघटच्या जिल्हा व कन्नड कार्यकारिणीत नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 30/5/2022 जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा अतुल भाऊ खुपसे पाटिल याच्या आदेशानुसार प्रदेश कार्याध्यक्ष उमाकांत तिडके पाटिल सुचनेनुसार औरंगाबाद जनशक्ती शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व कन्नड कार्यकारिणीत नविन पदाधिकारी यांच्या नियुक्त्या देणात आला औरंगाबाद जनशक्ती संघटना महिला आघाडी जिल्हा संघटक पदी मनिषाताई दांडेकर यांची निवड करण्यात आली तर कन्नड तालुका सहसचिव पदी अनिल सिरपतराव थेटे तालुका उपाध्यक्ष पदी साहेबराव जाधव औराळा सर्कल प्रमुख पदी पुंजाराम पवार यावेळी जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष उदय भाऊ गवळी कन्नड तालुका अध्यक्ष संतोष सोळुंके जनशक्ती संघटना महिला आघाडी अध्यक्ष पदमाताई पाखरे महिला आघाडी हतनुर सर्कल प्रमुख शिलाबाई रामभाऊ नांगरे मॉडम तालुका उपाध्यक्ष दिनेश भाऊ राजपुत सोशल मीडिया तालुका उपाध्यक्ष सागर गिरी व ईत्तर पदाधिकार्याचा उपस्थित निवड करण्यात आला आहे तसेच पुढील शिवना टाकळी प्रकल्प येथे दिनांक 1/6/2022 वार बुधवार रोजी कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देनासाठी जलसमाधी आंदोलनाची चर्चाही करण्यात आली आहे.