ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे रॉबिज दिवस साजरा
![](https://apnews.co.in/wp-content/uploads/2023/10/IMG-20231010-WA0010.jpg)
प्रतिनिधीः राहुल गहुकर
ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे मायक्रोबायोलॉजी विभाग व गोंडवाना विद्यापीठ मायक्रोबायोलॉजी असोसिएशन मार्फत जागतिक रॉबिज दिवस साजरा करण्यात आला .
दि. 30-9-2023 ला डॉ. लुईस पॉशर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ जागतिक रॉबिज दिवसाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अमीर धमानी सर उपस्थित होते.प्रमुख पाहुणे प्रा.रोहित चांदेकर सर, डॉ . बीजनकुमार शील सर व डॉ.निलेश ठवकर सर उपस्थित होते. डॉ . अमीर धमानी सर , डॉ. शील सर व डॉ. ठवकर यांनी लुईस पॉशर व रॉबिज आजारावर विद्यार्थ्याना सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी खूप मोठा प्रमाणात पोस्टर प्रदर्शन स्पर्धेत व वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला होता .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयआतील विद्यार्थिनी कू. कोमल राऊत हिने केले. व कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. युवराज बोधे सरांनी केले. व आभार प्रदर्शन कू.वैष्णवी सातपुते हिने केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.