152 दिव्यांग व्यक्तिंना दिव्यांग स्मार्ट कार्ड व 21 आंतरजातीय वैवाहिक जोडप्यांना 50,000 रुपयांचा धनादेश वाटप
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
समाज कल्याण विभाग जिल्ह्या परिषद चंद्रपुर यांचे वतीने आंतरजातीय विवाह करणारे लाभार्थ्यांना धनादेश वाटप, दिव्यांग व्यक्तिंना स्मार्ट कार्ड वाटप पंचायत समिति सभागृह चिमुर येथे संम्पन झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपुर जिल्हा परिषद उपाध्यक्षा रेखाताई कारेकर यांचे हस्ते सम्पन्न झाले, चिमूर पंचायत समिति सभापति लताताई पिसे कार्यकामच्या अध्यक्षस्थनी होत्या, समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपुर यांचे तर्फे पंचायत समिती चिमूर येथील संम्पन झालेल्या कार्यक्रमात 152 दिव्यांग व्यक्तिंना स्मार्ट कार्ड व 21 आन्तरजातीय वैवाहिक जोडप्यांना 50 हजार रूपये धनादेश वाटप करण्यात आले, यावेळी जिल्ह्या परिषद सदस्य मनोज मामिडवार, ममताताई डुकरे, पंचायत समिति सदस्य तथा उपसभापति रोशन ढोक, पंचायत समिति सदस्य प्रदीप कामडी, शांताराम शेलवटकर, भावनाताई बावनकर, गिताताई कारमेंगे, चिमूर पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी धनंजय सालवे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी गुंटीवार, आभार प्रदर्शन संगणक प्रगनक आरती पुलेकेलवार यांनी केले, कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता समाज कल्याण विभाग चंद्रपुर व पंचायत समिती कर्मचारी वृन्दानी अथक परिश्रम घेतले