ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते गुरवळा नेचर सफारीचा शुभारंभ

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

वनविभाग गडचिरोली तथा संयुक्त वनव्यवस्थापन समिती गुरवळा हिरापूर यांचे संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या गुरवळा नेचर सफारीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे शुभहस्ते तसेच गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डाॅ. किशोर मानकर यांचे प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.


सदर कार्यक्रमास उपवनरंसक्षक डाॅ. कुमारस्वामी शि.र., सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, ग्रा.पं. गुरवळा सरपंच दर्शना भोपये, उपसरपंच प्रकाश बांबोळे, ग्रा.पं. शिरपूर सरपंच दिवाकर निसार, सं.व.व्य.स गुरवळा अध्यक्ष निलेश गेडाम, सं.व.व्य.स शिरपूर अध्यक्ष रमेश मेश्राम, तंटामुक्त समिती गुरवळा अध्यक्ष प्रकाश मंटकवार, माजी सरपंच गुरवळा निशा आमतुलवार, ग्रा.पं. सदस्य चंद्रकांत भोयर आदी उपस्थित होते.


साधारणतः एक वर्षासाठी गडचिरोली वनवृत्ताचे अतिरीक्त कार्यभार असलेले तत्कालीन मुख्य वनसंरक्षक प्रविण कुमार यांच्या कल्पनेतून उदयास आलेल्या निसर्ग पर्यटनाचा विषय सहाय्यक वरसंरक्षक सोनल भडके यांनी अथक प्रयत्नातून साध्य करून वनसंरक्षक डाॅ. किशोर मानकर यांचे मार्गदर्शनात व गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक डाॅ. कुमारस्वामी शि.र. यांच्या प्रशासकीय व तांत्रीक सहभागातून त्याचप्रमाणे संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश गेडाम व रमेश मेश्राम यांच्या विशेष प्रयत्नाने उदयास आलेल्या गुरवळा नेचर सफारीचा उद्घाटन समारोह आज संपन्न झाला.
सदर निसर्ग पर्यटनाचे मुख्य उद्देश म्हणजे लोकसहभागातून वन व वन्यप्राणी यांचे संवर्धन तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे आर्थिक दर्जा उंचावून बळकटीकरण करणे आहे. व रोजगार निर्मिती करणे.
लोकप्रतिनीधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समन्वयाने जंगलांचा विकास साधने शक्य होते. व गुरवळा नेचर सफारी प्रशासकीय मदत करण्याचे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.
नेचर सफारीतून स्थानिकांना रोजगार निर्मिती होणार. तसेच समिती व ग्रामपंचायतीसोबत समन्वयाने काम केल्यास गावांचा विकास करणे शक्य होते असे प्रतिपादन वनसंरक्षक डाॅ. किशारे मानकर यांनी केले.
गुरवळा नेचर सफारी यशस्वीपणे प्रारंभ करण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, क्षेत्र सहाय्यक अक्षय कन्नमवार, वनरक्षक गुरवळा गुरू वाढई, वनरक्षक प्रियंका रायपुरे, वनरक्षक येवली धर्मराव दुर्गमवार व वनपरिक्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close