खा. अशोक नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून कचारगढ़ यात्रा येथे संरक्षणभिंत मंजूर कामाचे भुमिपूजन सोहळा संपन्न
केंद्रीय राज्यमंत्री मा.फगणसिंह कुलस्ते व खा.अशोक नेते यांच्या शुभहस्ते कुदळ मारुन करण्यात आले.
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांच्या विशेष स्थानिक विकास निधी या योजने अंतर्गत १० लक्ष रूपयांचे संरक्षणभिंत कामाचे निधी मंजूर करुन कचारगढ़ यात्रा या ठिकाणी मौजा-जमाकुडो जनजाती चेतना समिती मौजा- कचारगढ ता.सालेकसा जि.गोंदिया येथे संरक्षण नाल्याच्या बाजूला संरक्षणभिंत बांधकामाचे भूमिपुजन दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोज गुरूवार ला केंद्रीय राज्यमंत्री मा.फगणसिंह कुलस्ते व खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोक नेते यांच्या हस्ते कुदळ मारुन भूमिपूजन सोहळा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
यावेळी लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड.येशूलाल उपराडे,शहराध्यक्ष पिंटु अग्रवाल,आदिवासीचे नेते शंकरलाल मडावी,धानोरा शहराध्यक्ष सारंग साळवे, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.