ताज्या घडामोडी

चामोर्शी शहरात स्वच्छतेचा जागर

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

शहारात आज ०२ ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चे प्रणेते लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्याने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करत या जयंती चे औचित्य साधुन चामोर्शी शहरात खासदार अशोकजी नेते यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसह स्वतः हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा जागर करित स्वच्छता अभियान मोहीमेचे नेतृत्व केले.

मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून (दि.१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत (२ ऑक्टोबर) सुरू असलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता-सेवा पंधरवाडा’अंतर्गत दररोज विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज चामोर्शी शहरात स्वच्छता अभियान राबवून शहरवासियांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

यावेळी खा.नेते यांनी बोलतांना स्वच्छतेचे महत्व विशद करून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशभरात, स्वच्छतेचा संदेश देत प्रत्येक नागरिकांनी आपल्या जिवनाचा एक तास ‘स्वच्छतेसाठी द्यावा असा संदेश दिला.या संदेशाचे पालन करित आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करत चामोर्शी शहराची स्वच्छता केली अतिशय मौलाचा क्षण माझ्या सह भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिले.याचा अभिमान असून आनंदाचीबाब आहे असे प्रतिपादन खासदार श्री. अशोक नेते यांनी याप्रसंगी केले.

खा. अशोक नेते यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांसह व नगर परिषद प्रशासनाच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वच्छता अभियान वाळवंटी चौक ते लक्ष्मी गेट चौक पर्यंत रॅली काढण्यात आली या रॅलीत प्रामुख्याने प्रथमच भाजपा शहर पदाधिकारी यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे शेकडो पदाधिकाऱ्यांनीसह सहभागी राहुन हे अभियान राबविण्यात आले.

याप्रसंगी प्रामुख्याने कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांनी केले. यावेळी भाजप किसान आघाडी अध्यक्ष रमेश बारसागडे ,कोमेरवार सर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निलजी वरघंटे, सहकार आघाडी जिल्हा अध्यक्ष आशिष भाऊ पिपरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरपंचायत गट नेते राहुल भाऊ नैताम ,जेष्ठ नेते माणिक कोहळे, युवा नेते नरेश आल्सावार,नीरज रामानुजवार ,वासुदेव चीचघरे, रेवनाथ कुसराम ,राजू धोडरे , अनिल बोदलकर ,धनराज वासेकर, साईनाथ गव्हारे , रुपेश नैताम ,विजय गेडाम ,विलास चरडूके ,शहर अध्यक्ष सोपान भाऊ नैताम भाजपा उपाध्यक्ष स्वप्निल भाऊ वरघंटे , सहकार आघाडी जिल्हा अध्यक्ष आशीष भाऊ पिपरे ,भाजपा तालुका अध्यक्ष आनंद भाऊ भांडेकर माजी जिल्हा परीषद सदस्या विद्या ताई आभारे , शिल्पा रॉय नगरसेविका सोनाली ताई पीपरे ,गीता ताई सोरते , रोशनी ताई वरघंटे, माजी सरपंचा छाया ताई कोहळे तसेच अनेक गणमान्य प्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी उल्लेखनिय स्वच्छतेमध्ये काम करणाऱ्या न.प.च्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close