ताज्या घडामोडी

वरोरा उप जिल्हा रुग्णालयात डाॅ. दिवस साजरा

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर दिवस साजरा करण्यात आला.डाॅ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक, डॉ बुटोलीया अस्थीरोग तज्ञ, डाॅ बर्षा भुसे फिजिओथेरपी तज्ञ, डॉ अमीत गुरणूले लेप्रोस्कोपी सर्जन इत्यादी डॉक्टर हजर होते.आंनंदीबाई जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रास्ताविक सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी केले आणि डाॅक्टरांच्या जिवनावर प्रकाश टाकला व आनंदी बाई जोशी यांच्या कार्यावर महती सांगितली.एवढ्या कठीन परीस्थितीही त्यांनी आपले मेडिकलचे शिक्षण घेवून ज्या गोष्टी ची सोय भारतात होत नव्हती, रोगनिदान होते नव्हते,त्याची त्यांना गरज वाटू लागली आणि बाहेर देशात जाऊन उच्चशिक्षण घेऊन भारतात त्यांनी चांगली आरोग्य सेवा दिली .आणि रुग्णांना चांगला फायदा होऊ लागला.

त्यांच्या कार्यामुळे त्या नावलौकिकाला आल्या.तसेच आता सध्याची परिस्थिती पाहता डाॅक्टरांनी आपल्या ला फिट ठेवावे व हसतखेळत रूग्ण सेवा करावी असे प्रतिपादन केले.डाॅ. शेंन्डे नेत्रतज्ज्ञ, डॉ. भुसे, डॉ,गुरणूले यांनी आपले विचार व्यक्त केले.सर्व डॉक्टरांना बॅच लावुन पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.व सर्वांनी डॉक्टर डे च्या शूभेच्छा दिल्या.डाॅ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक यांनी आपल्या भाषणात डॉ च्या कामकाजा विषयि आपल्या जबाबदारी विषयी समजावून सांगितले आणि शूभेच्छा दिल्या. सौ सोनाली राईसपायले यांनी सूत्रसंचालन केले व नेहा इंदुरकर यांनी आभारप्रदर्शन केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close