पोलिस मिञ परिवार समन्वय समिति पाथरी च्या वतिने मा.पोलीस अधिक्षक , परभणी यांना निवेदन देण्यात आले
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
पाथरी पोलीस स्टेशन येथिल पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियाला स्थगिती देऊन पुर्ववत ठिकाणी स्थानांतरित करण्या बाबत . महोदय , वरिल विषयाला अनुसरुन पोलीस मित्र परिवार समन्वय समिती तर्फे आपणास निवेदन देत आहोत की.सध्याची आणिबाणिची स्थिती व काळ लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था साबुत ठेवण्यासाठी पोलीस विभागातील अधिकारी / कर्मचारी यांची नागरिकांना अत्यंत गरज आहे.त्यात पोलीस संख्याबळ कमी असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर १२ ते २४ तास सेवेचा अतिरिक्त मानसिक तनाव निर्माण होतांना दिसत आहे.याचाच एक भाग म्हणजे आपल्या अदेशावरुन पाथरी पोलीस स्टेशन कार्यरत पोलीस कर्मचारी मुंजाजी वामनराव जामगे पोशि . ( 616 ) , भास्कर मोतीराम बर्गे पोह ( 68 ) व शेख अलिम जानिमीयाँ.पोशि . ( 1469 ) यांची पोलीस मुख्य कार्यालय परभणी व्ये करण्यात आली आहे . सध्या आणिवाणिची परिस्थिती लक्षात घेता त्यात पाथरी पोलीस स्टेशन येथेही पोलीस संख्याबळ कमी आहे.करिता आपणास या निवेदन द्वारा विशेष विनंती की या तिन्ही कर्तव्य दक्ष पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीला स्थगिती देऊन पुर्ववत ठिकाणीच ( पाथरी पोलीस स्टेशन ) स्थानांतरित करण्यात यावे.हि नम्र विनंती . निवेदनात अहमद अन्सारी म.रा.संघटक ,अजहरशेख हादगावकर मराठवाडा अध्यक्ष ,रेखाताई मनेरे महिला विभाग मराठवाडा अध्यक्ष ,शेख ईफतेखार बेलदार मराठवाडा उपाध्यक्ष ,मोहन जोशी ,अलताफ अन्सारी,भरत घांडगे,स.सलिम रईस कुरेशी ,उषा भाग्यवंत,सुमन साळवे,अय्युब खान,उध्दव ईंगळे फेरोज अन्सारी आसाराम भोकरे संर्वांचे स्वाक्षर्या आहेत .