सि एस सी चंद्रपूर वरोरा महा. शेतकरी उत्पादक कंपनी ली. वरोरा च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा येथे CSC चंद्रपूर वरोरा महा. शेतकरी उत्पादन कंपनी ली. कडून जागतिक महिला दिना निमित्य आईच्या आभाळभर मायेला शुभेच्या, बहिणीच्या निरागस छायेला शुभेच्या, मैत्रिणीच्या मनातल्या विश्वासाला शुभेच्या, पत्नीच्या जन्मभराच्या प्रवासाला शुभेच्या, आजीच्या डोळ्यातील पाण्याला शुभेच्या, लेकीच्या बोबड्या गाण्याला शुभेच्या, पुथ्वीवरील स्वर्गाच्या वारीला शुभेच्या, जगातील प्रत्येक नारीला शुभेच्या देत वरोरा तालुक्यातील होतकरू ६० महिलांना चंदनाचे झाड व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष – सौ. नर्मदाताई बोरेकर सरपंच वडगाव, कार्यक्रमाचे उद्घाटक – सौ. योगीताताई लांडगे महिला आयोग वरोरा यांनी केले व मार्गदर्शक मनून सौ. नेत्राताई इंगुलवार सखी मंच सदस्य व समाजसेविका चंद्रपूर, सौ. सोनुताई येवले अहिल्याबाई होळकर वृदाश्रम संचालक व समाजसेविका वरोरा, सौ. सुनंदाताई खंडारकर सखीमंच सदस्य व समाजसेविका भद्रावती, सौ. वैशालीताई वराटे सम-उपदेशक पोलिस स्टेशन वरोरा, सौ. प्रियाताई भोयर ग्राम पंचायत सदस्य बोर्डा, सौ. साधनाताई मत्ते सचिव CSC चंद्रपूर वरोरा महा. शेतकरी उत्पादक कंपनी ली. वरोरा या सर्वांनी महिलांचे स्वतंत्र अबाधित राहावे. त्यांना त्यांचा अधिकार मिळावा, त्यांना कुटुबामध्ये आणि समाजामध्ये सन्मानाने जगता यावे, त्यांचेवर होणारा अन्याय अत्याचार दूर व्हावा, स्त्री एक उपभोग्य वस्तू नसून ती क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे हे समाजानी समजून घ्यावे अश्या प्रकारे महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन कंपनीच्या संचालिका – सौ. साक्षीताई धानोरकर, सौ. अर्चनाताई देठे व सौ सारीकाताई इंगळे यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कंपनीच्या संचालिका सौ. सुगंधा पाचभाई यांनी केले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन CSC चंद्रपूर वरोरा महा. शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष . पांडुरंग गावंडे, उपाधाक्ष दत्ताभाऊ बोरेकर, संचालक . अनिल कुमरे, . विनोद निमसटकर, , देवराव गहुकर, पवन रामटेके अनिकेत पावडे, विशारद वकनोर व सर्व संचालक मंडळ यांनी केले.