मजरा (लहान) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकारिणी गठित व फलकाचे उद्घाटन
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा तालुक्यातील मजरा लहान येथे नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकारिणी गठित करण्यात आली व कार्यकारणी फलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ रामेडवार, उपाध्यक्ष राजू भाऊ कुकडे, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष मुजम्मिल शेख,मनसे नेते रमेश राजूरकर, तालुका अध्यक्ष वैभव डहाणे, उपाध्यक्ष प्रशांत बदकी, सचिव कल्पक ढोरे, वरोरा शहराध्यक्ष राहुल लोणारे यांच्या प्रमुख उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमात कार्यकारणी फलकांचे उद्घाटन करण्यात आले.
राजेंद्र धाबेकर विभाग प्रमुख, अध्यक्ष राहुल बोढे, उपाध्यक्ष विजय आपटे, सचिव धनराज वांढरे, संघटक सुभाष लढोदिया, नितीन मेश्राम बुथ अध्यक्ष, विठ्ठल पढाल गण अध्यक्ष तर सदस्य म्हणून सुरज झाडे,प्रशिक गेडाम,राजु जुमनाके, सुरेन्द्र वावरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य सारिका धाबेकर उपसरपंच प्रमुख तोडासे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बोढे, हर्षल निब्रड, मंगला आत्राम सह गावातील अनेक गणमान्य नागरिक यांची उपस्थिती होती.