मानवत येथे ईद उल अजहा ईद उत्साहात साजरी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत शहरात मुस्लिम बांधवांनी ईद उल अजहा अर्थात बकरी ईद उत्साहात आज (दि.१०) वार रविवार रोजी पार पडली.
ईद निमित्त शहरातील मुस्लिम बांधव उक्कलगाव रोड वर असलेली ईदगाह येथे सार्वजनिक रित्या नमाज पठण करतात मात्र या वर्षी दोन दिवसापासून सतत पाऊस होत असल्यामुळे ईदगाह मैदान हे चिखलमय झाले असल्याने मुस्लीम बांधवानी आपआपल्या परीसरातील मस्जीद मध्ये ईदची नमाज अदा करण्यात आली.
नमाज नंतर देशात शांतता बंधुभाव भाईचारा अबाधित राहावे यासाठी धर्मगुरू मुफ्ती मोहम्मद ईसाक साहब यांनी प्रार्थना केली तसेच पोलीस प्रशासन नगरपरिषद यांचेही आभार व्यक्त केले यावेळी माजी नगरसेवक सय्यद जमील ,माजी नगरसेवक हबीब भडके, समाजसेवक शेख मुस्ताक ,समाजसेवक शगिर खान ,गुफरान बागवान यांनी स्वच्छता कडे विशेष लक्ष दिले पोलिस निरीक्षक प्रकाश राठोड ,सहाय्यक पोलीस निरीक्षक फिरोज पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नमाज पठण नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकाची गळाभेट घेत शुभेच्छा देण्यात आल्या .