नेरी परिसरात नुकसानीच्या सर्वेक्षणाला सुरुवात
नदी व नाल्याजवडील शेत जमीन अधिक प्रभावीत होऊन शेतातील पिकांचे नुकसान.
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
दिनांक 21 जुलै 2022 रोज गुरुवारला चिखली व ओवाडा येथील धान, सोयाबीन व कापूस पिकांची पाहणी केली असता नदी व नाल्या काठिल शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळून आले आहे. संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला तर तलाव -बोळ्या तुडुंबभरल्या .दोन दिवसा अगोदर झालेल्या पावसामुळे चिमूर तालुक्यातील जनजीवन सुद्धा काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. पावसाचा सर्वाधिक फटका नेरी व परिसरात बसला आहे पावसाचा जोर ओसरल्यानंतर पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षणाला सुरुवात केली. तालुक्यात मागील आठवड्यापासून रोवणीच्या कामाला वेग आलेला आहे. दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत होते .शेतातील बांधांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतातील रोहिणी सुद्धा वाहून गेली त्यामुळे शेतकऱ्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आलेली आहे .त्यामुळे नुकसानीची सर्वेक्षण नेरीचे कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी कुंभरे महसूल विभागाचा ताफा घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून झालेल्या पिकाचे नुकसान यांचे सर्वेक्षण करीत आहे शासनाची बाधित कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ते सदैव कार्यरत आहे. चिमूर तालुक्यात पुरामुळे नदी नाल्याजवळील जमिनी अधिक प्रभावित झाल्या आहेत .महसूल विभाग शेत बांधावर पोचून बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण करीत आहे .18 जुलै 2022 रोजी रात्रो झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत होते. नदी नाल्या जवळील पाऊस कोसळण्याचे प्रमाण अधिक झाल्याने त्यांच्या काठच्या शेतजमिनी जलमय झाल्या यात नेरी व परिसरातील शेत शिवारातील जमीन अधिक प्रमाणात प्रभावी झालेले आहे. शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. जमिनीवरील कपाशी ,सोयाबीन ,तूर तसेच धानाची रोवणी व धानाचे परे पूर्णपणे पाण्यामुळे बाधित झालेले आहे त्यामुळे शेतकरी अहवाल दिल झालेला आहे.