चिमूर-नागभीड विधानसभेतील सर्वच गावे ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा- आम आदमी पार्टी ची मागणी
डॉ. अजय पिसे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, त्वरित कारवाही साठी ईमेल द्वारे अहवाल सादर.
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
पिकांचे-मालमत्तेचे, व्यापाऱ्यांचे नुकसान, शाळा असुरक्षित, उखळलेले रस्ते, सगळीकडे घाणीचे साम्राज्य, आरोग्याच्या मोठा धोका, तुटपुंजी आरोग्यव्यवस्था यावर प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार असून या मुद्द्यांना धरून आम आदमी पार्टी ने चिमूर-नागभीड विधानसभेतील गावांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारयांमार्फत पाठवून चिमूर विधासभेतील सर्वच गावे ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली आहे.
मागील दोन आठवड्यांपासून चिमूर-नागभीड विधानसभेतील सर्वच गावांमध्ये भरपूर प्रमाणात पाउस झालेला आहे. संततधारेमुळे शेत पाण्याखाली आले असून पेरणी केलेले सोयाबीन, कपास, तूर या पिकांची नासाडी झाली असून शेकडो घरांची पडझड झालेली आहे. अती पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत असून काही गावाचा जनसंपर्क तुटलेला आहे. काही गावांमध्ये पावसामुळे जीवितहानी झालेली आहे.
पावसामुळे गावोगावी रस्त्यांवर गड्डे पडले असल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तालुक्यातील शाळांमध्ये गळती होत असून त्याठिकाणी योग्य वेळेस डागडूगी व उपाययोजना न केल्यास लहान मुलांच्या जीवितास धोका आहे. असे काही झाल्यास यासाठी प्रशासन पूर्णतः जबाबदार राहील. विधानसभेतील गावा-गावात पाहणी करीत करतांना असे आढळले की उपसलेल्या नाल्यातील कचरा हा योग्य वेळेस जमा करून बाहेर न फेकल्यामुळे तीच घाण पावसामुळे गावात पसरली आहे. यामुळे लोकांच्या आरोग्याच्या व साथीच्या रोगाचा प्रश्न उद्भवू शकतो. परंतु या तालुक्यात आरोग्यव्यवस्था तुटपुंजी असल्यामुळे प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे, मजुरांचे व व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून मुख्यमंत्र्यांनी प्रशासनामार्फत त्वरित पंचनामे करून चिमूर-नागभीड विधानसभेतील सर्वच गावात ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी अशी मागणी आप कडून पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना करण्यात आलेली आहे. आप चे विलास दिघोरे, योगेश सोनकुसरे, विशाल इंदोरकर, नानक नाकाडे, आदित्य पिसे, प्रवीण चायकाटे, दिनेश मसराम, मधुकर सूर्यवंशी, अशोक रामटेके, नितेश तुमराम , मुकेश मसराम, खुशाल कसार, पवन पिसे, प्रदीप तुळसकर, मंगेश शेंडे रामभाऊ शाहणे ,अविनाश करकाडे, रवी पाठक ,प्रमोद भोयर ,शंकर रामटेके ,ईश्वर बागडे, प्रकाश बोरकुटे, मधुकर सूर्यवंशी, गुरुदास ठाकरे यांनी विधानसभेतील गावपातळीवर जाऊन अहवाल बनविलेला आहे.