नौकरी चा नांद सोडून केली काकडीची शेती
प्रतिनिधी:संजय नागदेवे तिरोडा
एक एकर शेतीत केला प्रयोग.
शेतकऱ्या समोर आव्हानांचा मोठा आदर्श.
बेरोजगार युवकाने नौकरी चाकरी चा नांद सोडून केली काकडीची शेती.
तिरोडा मुंडीकोटा येथील एका बेरोजगार युवकांने नौकरी साठी अनेकदा प्रयत्न करुनही त्यात त्याला अपयश आल्याने या युवकाने खचून न जाता आपल्या एक एकर शेतीतून उन्नतीचा मार्ग शोधून.या युवकाने केलेल्या या प्रयोगाचे आता कौतुक होत असून इतर युवक आणि शेतकऱ्यांना सुद्धा यातून प्रेरणा मिळत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे , प्राप्त माहितीनुसार मुडीकोटा येथील बेरोजगार युवक नामे नरेश चिंदु गजभीये यांचे शिक्षण एम.ए पदवीधर असून यांने अनेक कामाची जबाबदारी पार पाडली त्यात अपयश आले.त्यांची परिस्थिती बेताची असताना आई वडीलाचे निधन झाले.त्यावेळी त्यांच्या समोर परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठे आव्हान उभे झाले.त्यावेळी त्याने धीर न सोडता तो नौकरीच्या शोधात भटकत असतानी . त्याला नौकरी न मिळाल्याने खेचून न जाता शेती करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या कडे असलेल्या एका एकर शेतीत काय करता येईल यासाठी नरेश ने कॄर्षी विभागाच्या अधिकाऱ्यां कडून मार्गदर्शन घेतले . त्यावेळी मुडीकोटा येथील मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी नरेश ला काकडीची लागवड करण्याचा सल्ला दिला.हा सल्ला नरेश ला पटला त्यांने आपल्या एका एकर शेतात काकडीची लागवड केली.शेतात असलेल्या विहीरीच्या मदतीने तो काकडीच्या शेतीला सिंचन करीत होता तसेच वेळोवेळी कॄर्षी विभागाचे मार्गदर्शन घेत होता .यात तो यशस्वी झाला.यंदा पहिल्याच वर्षी काकडीचे भरघोस उत्पादन झाले.काकडी विक्री करण्यासाठी त्याला बाजार पेठेत जाण्याची गरज नसून नागपुर येथील व्यापारी शेतात येऊन दोन हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे काकडी खरेदी करून घेऊन जातात . काकडी च्या शेतीतून नरेश समॄद्ध झाला असून तो परिसरातील युवक आणि शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरला आहे .त्यांने पाच ते सहा जणांना रोजगार दीला.त्या आधी नौकरी च्या शोधात भटकंती करणाऱ्या नरेश ने काकडीची शेती करून त्यातून पाच ते सहा जणांना दररोज रोजगार देत आहे.काकडीच्या वाडीची देखभाल करण्यासाठी दोन मजूर नियमीत काम करीत असून चार महीला मजूर दररोज काकडी तोडण्याचे काम करतात . त्यामुळे त्यांना सुद्धा यातून रोजगार मिळत आहे .