ताज्या घडामोडी
आत्ता आधार कार्ड करावे लागणार दर 10 वर्षांनी अपडेट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आधार कार्ड च्या नवीन नियमानुसार प्रत्येक व्यक्तीला त्यांचे आधार कार्ड प्रत्येक 10 वर्षांनी अपडेट करावे लागणार ज्यामुळे त्यांना भविष्यात येणाऱ्या सर्व संधीचा लाभ घेता येईल जर त्यांनी आधार अपडेट नाही केले तर ते असे सर्व आधार कार्ड बंद होणार असे आदेशही UIDAI कडून देण्यात आले आहेत.अश्याच सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे सुरू आहे सर्व नागरिकांनी आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अचल गोयल,जिल्हा माहिती अधिकारी नीरज धामणगावे,नरेंद्र अडगावकर,अतुल निहाते व आधार केंद्र चालक शिवकण्या तुकाराम पौळ यांनी केले आहे.हे आधार कार्ड अपडेट शनिवारी व रविवारी कॅम्प मोडवर सुरू राहतील याची माहिती अक्षय कॉम्प्युटर्स चे संचालक तुकाराम पौळ यांनी दिली.