ताज्या घडामोडी

उमा नदिला वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमिंचे आंदोलन—:: नदीच्या पात्रात डंम्पींग

उमा नदी संकटात

मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे

चिमुर नगर परिषद कडुन उमा नदिच्या पात्रात डंम्पींग लावल्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने संपुर्ण डंम्पीग नदिच्या पात्रता वाहुन जात आहे.नदि स्वच्छतेवर सरकार कोट्यावधी रुपये खर्च केले जातात.याच मार्गांवरुन देशी विदेशी पर्यटक वाघाची झलक पाहण्यासाठी जात असतात.पर्यटक सुद्धा या मार्गाने जात असतांना नाक दाबून जातात.

पर्यावरण प्रेमिंकडुन नगर परिषद कडुन वारंवार निवेदने देण्यात आली पण निवेदनाला केराची टोपली दाखवली.याच परिसरात डेंगुचे रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.या घनकच-या मध्ये प्लास्टिक , कोंबड्या चे पिसे , कागद व ओला कचरा आदी समाविष्ट असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे.त्यामुळे रोगराईला निमंत्रण दिले आहे.उमा नदिला वाचविण्यासाठी नगरपरिषद विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी पर्यावरन संवर्धन समिती अध्यक्ष कवडू लोहकरे, सुशांत इंदोरकर ,राज बुच्चे , मोहन सातपैसे , मंगेश वांढरे ,पिपलायन आष्टनकर, भुनेश वांढरे,विजय वांढरे, मंगेश शेंडे , राहुल गहुकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया

“” नगरपरिषद वारंवार जनतेला घाण करू नका,परिसर साफ ठेवा,कचरा करु नका आदी स्वच्छतेबाबत आवाहन करित असतात पण नगरपरिषदेलाच नदि पात्र स्वच्छतेचा विसर पडला आहे.”””

कवडू लोहकरे
पर्यावरण प्रेमी चिमुर

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close