शेतकरी कामगर पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश नान्हे यांचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेना नेते भास्कर जाधव यांचे हस्ते केला प्रवेश
प्रतिनिधी:राहुल गहुकर
चंद्रपूर जिल्हाचे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश नान्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यावर प्रभावी होऊन. जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांचे मारगदर्शनात उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांचे नेतृत्वात शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
शिवसेना पक्ष्याची आढावा बैठक शिवसेना नेते. पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव यांचे उपस्थीतीत मातोश्री सभागृह चंद्रपूर येथे सम्पंन झाली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश नान्हे यांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत भास्कर जाधव यांचे हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी पूर्व विदर्भ संघटक प्रकाश जाधव. शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे. संदीप गिरहे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रकाश नांन्हे यांच्या प्रवेशाने चिमूर तालुक्यात शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले असून संघटन वाढण्यास मदत होईल.
प्रकाश नान्हे यांचे पक्ष प्रवेशावेळी. उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे. विधानसभा समन्वयक भाऊराव ठोंबरे. तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते. शिवसेना शहर प्रमुख नितीन लोणारे. देविदास गिरडे. संजय वाकडे. किशोर ऊकुंडे. समीर बल्की. राजेंद्र जाधव. शार्दुल पचारे.उपस्थित होते