ताज्या घडामोडी

रमजान महिन्या सुरु होण्यापूर्वी दर्गा परिसरातील सर्वच रोहित्र (डि पी)यांची दुरुस्त करण्याची कनिष्ठ अभियंता कडे लोकश्रेय ची मागणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

इस्लाम धर्माचा पवित्र रमजान महिना सुरु होण्यापूर्वी झोन क्रमांक तीन मधिल दर्गा परीसरातील सर्वच रोहित्र डीपीया च्या देखभाल दुरुस्ती करून जुने तार बदलून टाकण्याची लोकश्रेय मित्र मंडळ परभणी च्या वतिने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चे झोन क्रमांक तीन चे कनिष्ठ अभीयंता रवि मुळे यांच्या कडे एका शिष्टमंडळाद्वारे मागणी करण्यात आली आहे या शिष्टमंडळात लोकश्रेय मित्र मंडळा चे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार अमजद खान शेख शफी सय्यद सत्तार शेख मदार भाई यांचा समावेश होता
पवित्र रमजान महिना हा भर उन्हाळ्यात प्रारंभ होत असल्याने सतत फ्यूज जाणे नेहमी नेहमी विद्युत पुरवठा खंडित होणे जुने तारांचा एकमेकांना स्पर्श होवुन स्पाकींग होणे फ्यूज टाकण्यासाठी तांब्याचा वापर नसणे फुटलेले किट कयाट बदलावे फ्यूज काॅल वरील कंत्राटी कर्मचारीवर्ग ग्राहकाचे फोन न उचलणे या सारख्या प्रकारामुळे सर्रास ग्राहक समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने या सर्व प्रकारामुळे डी पी जळणे अपघात होणे कर्मचारी व ग्राहका मध्ये वाद होणे वादाचे रुपांतर भांडण होणे एक मेका विरुध्द कायदेशीर गुन्हे दाखल होणे या सर्व घटनाक्रमाला आळा घालावा असे हि निवेदनात नमुद करण्यात आले आहे
दर्गा परीसरातील दर्गा रोड येथील नर्गीस डीपी गालिब नगर येथील शादाब डीपी कुरबान अली शहानगर येथील मुमताज अली डीपी सेन्ट अगष्ट येथील शाळेजवळील डिपी कमान डीपी काजी बाग मेमन डीपी मुसतफा डिपि सय्यद शहा तुराबुलहक काॅलनी येथील खान डीपी एक मीनार परीसरातील इनामदार डीपी रहात काॅलनीतिल जुनी व नवी डीपी टिचर्स काॅलनीतिल डीपी अन्सार काॅलनीतिल रसुल डीपी पटेल डीपी पारवा रोड येथील इरफान डीपी 8080 डीपी मझर बाबा डीपी मास्टर कॅफे डीपी शौचालय डीपी जमाल डिपी फातिमा बिल्डींग जवळील धोबी डीपी राम नगर येथील डीपी आजम काॅलनीतिल येथील वाकळी डीपी ला सरळ करुन घ्यावे नविन व जुनी नुमायश डीपी या सर्वच डिपी यांची दुरुस्ती करून जुने जिर्ण झालेले तारे काढून नविन तारे टाकावे फ्यूज तार हे सर्वच डिपीयांना तांब्याचे तार टाकावे व कही ठिकणी नविन डीपी टाकवी अशी मागणी करण्यात आली असून या निवेदनावर लोकश्रेय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार सय्यद सत्तार सय्यद इब्राहिम याच्यां स्वाक्षऱ्या आहेत

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close