ताज्या घडामोडी

पाथरीचे उपविभागिय अधिकारी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

युवा उपविभागिय अधिकारी शैलेश लाहोटी यांचा वाढदिवस ते राहत असलेल्या गणेशनगरातील रहिवाशांनी अगदी उत्साही वातावरणारत सोमवारी विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा केला.
पाथरीतील उपविभागिय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अल्पावधितच ख्याती मिळवलेले शैलेश लाहोटी अगदी मनमिळाऊ व्यक्तीमत्व आहे.पदाचा कोणताही बडेजाव न करता अगदी सामान्यातल्या सामान्यात रमणारा हा उच्चपदस्त अधिकारी गणेशनगर वसाहतीत राहातात या ठिकाणी त्यांनी विविध उपक्रम राबवत स्वखर्चातून ओपन स्पेस मध्ये अनेक विकास कामे सुरू केली आहेत.या मुळेच गणेश नगरवाशियां मध्ये त्यांनी जिव्हाळ्याचे नाते तयार केले आहे.
सोमवार ३० जानेवारी रोजी या युवा अधिका-याचा वाढदिवस त्यात शिक्षक मतदार संघाचे मतदान सहाजिकच त्यांच्यावर मोठी जबाबदारी या बिझी सेड्यूल्ड मधून वेळ काढत रात्री उशिरा त्यांनी गणेशनगर वाशियांच्या शुभेच्छांचा स्विकार केला. या वेळी संपिर्ण वसाहती मध्ये फ्लडलाईट लाऊन सर्व वसाहतीत दिव्यांचा लखलखाट केला. तर ओपन स्पेसच्या गार्डन साठी नारळांच्या वृक्षां सह विविध फळे वृक्षांची भेट ही दिली.
गणेशनगर वाशियांनी शहरातील मानवत कडे जाणा-या महामार्गालगत असलेल्या वृद्धाश्रमात शैलेश लाहोटी यांचा वाढदिवस वृद्धां सोबत साजरा करत या वृद्धाश्रमाला अर्थिक मदत ही दिली.
या वेळी उपविभागिय अधिकारी लाहोटी म्हणाले की मला गणेशनगर वाशियांनी वाढदिवस साजरा करत सरप्राईज गिफ्ट दिले आहे. मी आणि माझ्या संपुर्ण कुटूंबाला तुमचा सदैव आशिर्वाद मिळावा या साठी इथे आलोय. माझ्या कडून फुल नाईतर पाकळी म्हणून मी थोडीशी अर्थिक मदत देतोय ती स्विकार करावी. या वेळी त्यांनी संपुर्ण वृद्धांची अस्थेवाईक पणे विचारपुस करत ख्याली खुशाली केली.
या कार्यक्रमासाठी महेश तौर, अंकुश मुंडे, पंकज बिराजदार, दत्ता आम्रित, कल्याण गिराम, सुजित पवार, भीमा केदार, पृथ्वीराज धर्मे, कालिदास राऊत, प्रवीण गोरे, लखन पवार, राहुल मुंदडा, ढोले, इंद्राळे , फंड‌ , प्रभाकर बादाडे ,सुनील जाधव, ज्ञानोबा काळे, संतोष नखाते, नवघरे, यांची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close