ताज्या घडामोडी

काग (सोनेगाव) येथील रेती घाटावर धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण

उपसंपादक : विशाल इन्दोरकर

भारतीय क्रांतिकारी संघटनेतर्फे चिमूर तालुक्यातील काग सोनेगाव येथे दिंनाक 20/4/2021 ला ठिक दुपारी 12.00 वाजेपासून धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.

उपोषणातील मागण्यांमध्ये सन 2021 काग सोनेगाव रेती घाट लिलाव प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी, काग (सोनेगाव) येथील रेती घाटातील अंदाजे 80 लाख रूपये किंमतीची रेती चिमूर तहसीलदार, तलाठी व इतर 20 ट्रॅक्टरच्या अनोळखी चालक मालक याचें संगनमताने अवैधरीत्या रेती तस्करी करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, रेती घाट लिलाव प्रक्रियेत नियमबाह्य अधिकाराचा वापर करून झालेल्या भ्रष्टाचारात सहभागी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या पांदन रस्त्यावरून ओव्हरलोड रेतीची वाहतूक करीत असल्याने, झालेल्या पिकाची नुकसान भरपाई करण्यात यावी उपोषनकर्त्यांच्या अशा मागण्या आहेत. जो पर्यंत अवैधरीत्या रेती तस्करी थांबवली जात नाही, नियमबाह्य भ्रष्ट बेजबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होत नाही व मागण्या मान्य केल्या जाणार नाही तोपर्यंत उपोषण आंदोलन सूरू राहील असे उपोषणकर्ते कैलाश भोयर आणि सांरग दाभेकर यानीं म्हटले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close