” जागतिक महिला दिन” पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या वतीने पाथरी तहसील कार्यालय येथे साजरा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.८/३/२०२२ : परभणी जिल्हातील पाथरी तहसील कार्यालयात पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे संथापक अध्यक्ष मा.डॉ. संघपाल उमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व मराठवाडा महिला प्रमुख मा.रेखाताई मनेरे मॅडम यांच्या व परभणी,पाथरी येथिल सर्व पदधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिनानिमित्त पाथरी तहसीलदार श्रीमती सुमन मोरे मॅडम व विविध क्षेञात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा शाल,हार देऊन सत्कार करण्यात आला.व महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.तहसीलदार सुमन मोरे मॅडम यांनी समितीच्या कार्या विषयी सखोल चर्चा केली व समितीच्या ध्येय-धोरणाचे,कार्याचे व सर्व पदधिकाऱ्यांचे खुप कौतुक करुन प्रशांसा केली व समितीच्या पदधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी सौ.मुक्ताबाई नामदेव डोगंरे,सौ.शिला गायकवाड सौ.सुशिला मनेरे,सौ.सुमन साळवे,प्रजावती नाथभजन यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहकारी महिला मा.संगीता शिंदे मॅडम यांना सन्मानित करण्यात आले.व तहसिलदार मोरे मॅडम यांनी पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या सर्व महिला पदधिकाऱ्यांचा सन्मान व सत्कार केला व सर्व महिलांना याप्रसंगी “जागतिक महिला दिनाच्या” सुभेच्छा दिल्या.