गोंदिया येथील अवंती चौकात ट्रकच्या धडकेत विद्यार्थीनीचा मृत्यू

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
दिनांक १४/१२/२०२१ ला गोदिंया मधिल अवंती चौकात भरधाव वेगाने जानाऱ्या ट्रकने सायकल स्वार विद्यार्थीनीला धडक दिली यामध्ये विद्यार्थीनीचा जागेवरच मृत्यु झाला.
मृत विद्यार्थीनीचे नाव पायल महेश मस्करे वय१६ वर्ष असे असून ती गोंदिया तालुक्यातील कटंगी येथे मामा च्या घरी राहुन शिक्षण घेत होती व पायल मामा च्या घरुन शिक्षण घेण्या करिता कटंगी येथून गोंदिया येथे कॉलेज ला सायकलने जाणे येणे करित होती. दुपारच्या सुमारास कॉलेज सुटल्यावर ती सायकलने घरी जान्यासाठी निघली असता समोरुन येनाऱ्या ट्रक क्र. एम एच ३५ ए जे १४१९ नी जोरदार धडक दिली व तीचा जागेवरच मृत्यु झाला. घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले ट्रकचालका विरुद्ध गुन्हा दाखल केला
सदर मृत पावलेली मुलगी भडंगा येथील रहीवासी आहे.ती इयत्ता 11 वी ची विद्यार्थीनी होती,या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.वास्तविक या चौकात गतीरोधक असतानाही वाहनचालक चौकात भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याचे नेहमीच दिसून येते तर वाहतूक पोलीस हे एखाद्या कोपऱ्यात बसून फक्त बघ्याची भूमिकेत राहत असल्याचे नेहमीचेच झाले आहे.
वाहनाच्या गतीवर आळा घालण्यासाठी चौकात वाहतूक विभागाने बैरीकेट्स लावण्याची मागणी अवंती चौकातील नागरिक करत आहेत.