ताज्या घडामोडी

केंद्रीय अर्थसंकल्प कल्याणकारी;सर्व घटकांना न्याय देणारा:-माजी आ. देशमुख

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

बुधवार दि. 1 ला लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्व घटकांना न्याय देणारा असल्याचे प्रतिपादन योगेश्वरी शुगर्सचे चेअरमन तथा भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांनी केले आहे.
बुधवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्व घटकांना न्याय देण्यात आला असून विशेष करून ७ लाखा पर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्याचा निर्णय क्रांतिकारी असल्याचे आर.टी. देशमुख यांनी सांगितले तसेच मोफत अन्न योजना, ८० कोटी लोकांना मोफत रेशन,ऍग्री स्टार्टअप साठी फंडाची तरतूद, देशात १५७ मेडिकल नर्सिंग कॉलेज,रेल्वे साठी २ लाख ४० हजार करोड रुपये,फलोत्पादना साठी २२०० कोटींची तरतूद, पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटींची तरतूद, पीएम आवास योजनेचा खर्चात ६६ % वाढ, इ न्यायालय स्थापना, व्यवहारात पॅन कार्डला ओळख पत्र म्हणून मान्यता, ऑरगॅनिक शेती साठी ३५ हजार कोटींची तरतूद या सह बरेच निर्णय क्रांतिकारी असून सामान्य वर्ग, शेतकरी,कष्टकरी व नोकरदारांसाठी हा अर्थसंकल्प विशेष महत्वाचा ठरल्याचे प्रतिपादन मा.आ. आर.टी.देशमुख यांनी केले असून त्यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close