मतदार जनजागृती तथा नव मतदान नोंदणी अभियान कार्यक्रम सम्पन्न

प्रतिनिधी: चंदन पाटील
आठवले समाजकार्य महाविद्यालय शेडेगाव कॅम्पस येथे दिनांक 24-8-2023 ला तहसील कार्यालय चिमूर चे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शुभांगी वडस्कर, अतिथी श्री निशिकांत मेहरकुरे पर्यवेक्षक श्री सचिन कापसे (शिक्षक )बी. एल. ओ. यांच्या उपस्तितीत कार्यक्रमांची सुरुवात झाली. श्री निशिकांत मेहरकुरे ( शिक्षक ) यांनी मतदारांनी जागरूक राहावे व मतदानापासून वंचीत राहू नये यासाठी प्रयत्न करावे. असे मत मांडले. श्री सचिन कापसे (शिक्षक ) बी. एल. ओ. या नात्याने विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेतले.. महाविद्यालयच्या प्राचार्य डॉक्टर वडस्कर यांनी समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्र कार्याच्या माध्यमातून परिसरात जनजागृती करावी. असे मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉक्टर सी. जे. खंगार कार्यक्रम अधिकारी रा. से. यो. यांनी केले. आभार प्रदर्शन डॉक्टर प्रीती दवे यांनी केले. कार्यक्रमांची सांगता. राष्ट्रगीताने करण्यात आली.