ब्रम्हपुरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त जाहीर व्याख्यान
तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभूर्णे ब्रम्हपूरी
ब्रम्हपुरी येथील राजीव गांधी सभागृह येथे कार्यक्रमाचे उदघाटक मा.विजयभाऊ वडेट्टीवार
विरोधी पक्षनेते म.रा. तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा यांच्या सौजन्याने सत्याग्रह माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु या विषयावर
कार्यक्रमाचे वक्ते मा. निरंजन टकले साहेब जेष्ठ विचारवंत व पत्रकार व
मा. तुषार गांधी साहेब महात्मा गांधी यांचे पणतू लेखक व जेष्ठ विचारवंत यांचे जाहीर व्याख्यान पार पडले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने शहरवासियांची गर्दी होती. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रा.डॉ. देविदास जगनाडे जेष्ठ कॉग्रेस नेते आणी प्रमुख अतिथी म्हणून मा.प्रा. सुभाष बजाज अध्यक्ष, जेष्ठ नागरिक संघटना, ब्रम्हपुरी मा. ॲड.गोविंद भेंडारकर संयोजक, राष्ट्रपिता म. गांधी समिती मा.प्रा. हरिश्चंद्र चोले सचिव, जेष्ठ नागरीक संघटना ब्रम्हपुरी उपस्थित होते.