ताज्या घडामोडी

हिवरा येथील सिमेंट काँक्रिट रोडचे भूमिपूजन आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे हस्ते संपन्न

हिवरा गावातील प्रत्येक समस्या तात्काळ मार्गी लावणार , गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव सहकार्य करणार -आमदार सुभाष धोटे यांचे प्रतिपादन

शहर प्रतिनिधी : प्रमोद दुर्गे गोंडपीपरी
9834754521

गोंडपिपरी- तालुक्यातील हिवरा या गावात सिमेंट काँक्रिट रोडचे भूमिपूजन समारंभ राजुरा विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार श्री सुभाष भाऊ धोटे यांचे शुभ हस्ते संपन्न झाला.
भूमिपूजनानंतर ग्रामपंचायत मध्ये आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे साहेबांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.आमदार साहेबांनी ग्रामपंचायत हिवरा कार्यालयात गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेकांनी विविध समस्यांचे निवेदने सादर केली. ज्यामधे वार्ड क्रं ३ येथील पाण्याची समस्या, अपुरा निधी मूळे रोडचे काम अर्धवट होत असल्यानं वाढीव निधी मंजूर करण्याबाबत,ग्राम संघांची मागणी, बुद्ध विहार सभागृहाची मागणी,गावातील वर्धा नदीकडे जाणारा माऊली रस्त्याला खडीकरण मंजूर करण्याबाबत मागणी, हिवरा वार्ड क्रं. २ माऊली कडून धाबा जाणारा रस्ता मजबूत खडीकरण मागणी, गावातील अंतर्गत नाली बांधकाम मागणी अश्या अनेक समस्या ग्रामपंचायत तथा गावकऱ्यांनी मांडल्या. या सगळ्या मागण्या आमदारांनी जाणून घेतल्या. वरील सर्व समस्या सोडविण्यासाठी माझे सतत सहकार्य राहणार व वेळेवर येणारी कोणतीही अडचण असो, ती तात्काळ मार्गी लावण्यासाठी मी कटिबध्द राहील आणि गावाच्या विकासासाठी माझे पूर्ण समर्थन राहणार असे आमदार श्री. सुभाष भाऊ धोटे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
प्रसंगी श्री निलेश पुलगमकर सरपंच ग्रा.पं. हिवरा, सौ. वर्षाताई कुत्तरमारे उपसरपंच हिवरा,श्री. जितेंद्र गोहणे सदस्य ग्राम पंचायत हिवरा,सौ. पुष्पाताई हिवरकर सदस्य ग्रा.प. हिवरा सौ.प्रतिमाताई आक्केवार सदस्य ग्रा.प. हिवरा सौ.अरूनाताई नेवारे सदस्य ग्रा.प. हिवरा श्री.देवानंद आक्केवार सदस्य ग्रा.प. हिवरा, श्री. तुकाराम झाडे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी गोंडपिपरी,देवेंद्र बट्टे शहराध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी गोंडपिपरी,देवीदास भाऊ सातपुते अध्यक्ष सरपंच संघटणा ता.गोंडपिपरी, नामदेव सांगडे माजी सरपंच धाबा, सचिन फुलझेले विधानसभा सचिव काँग्रेस, प्रकाश हिवरकर माजी उपसरपंच हिवरा, शंकर येलमुले, गयाबाई डोके, भिवसन चहारे, रत्नजोत कांबळे, तेजराज कुत्तरमारे, सुधाकर मारोती पुलगमकर,नागोराव गोहने, पत्रूजी भोयर, जनार्धन पा. गोहने, देवाजी पा. चहारे, हरीचंद्र पा. कुत्तरमारे,किरण भाऊ मुंजनकर,शोभाताई कांबळे, सरिता मुंजनकर व गावातील महिला व नागरिक उपस्थित होते.
सरपंच निलेश पुलगमकर यांनी गावातील समस्या व गावाच्या विकासाबद्दल विचार मांडले, तर सदस्य जितेंद्र गोहणे यांनी सूत्र संचालन केले व उपस्तिथ सर्व पाहुने मंडळी व गावकऱ्यांचे आभार मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close