७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून गावकऱ्यांना दिला तंबाखू मुक्तीच्या संदेश
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
शालेय जीवनापासून चांगल्या सवयी व शिकवण मिळाल्यास निरोगी समाज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इंडियन डेंटल असोसिएशन नागपूरच्या पुढाकारातून व एकात्मिक आदिवासी विकास विभाग व शासकीय दंत महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शासकीय आदिवासी आश्रम शाळा व शासकीय आदिवासी वस्तीगृह यामध्ये तंबाखू मुक्त अभियान राबविण्यात येत आहे.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय आश्रम शाळां जांभूळघाट मध्ये तंबाखूमुक्त जीवनाची शपथ देण्यात आली. व पदयात्रा व रॅलीच्या माध्यमातून सर्व गावातील जनतेला तंबाखूमुक्त जीवनाच्या नारा देण्यात आला. (तंबाखू सोडा कर्करोग टाळा . जीवनाला हो मना तंबाखूला नाही म्हणा) अशा प्रकारचे अनेक नारे देण्यात आले. लोकांपर्यंत तंबाखू मुक्त जीवन कसे जगावे तंबाखूमुक्त घोषणांच्या माध्यमातून सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना सतत तंबाखूमुक्त जीवनाचे धडे देण्यात येत आहे. तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून तंबाखू विरोधी जीवन कसे जगावे याबद्दल सतत मार्गदर्शन इंडियन डेंटल असोसिएशन चे PO समन्वयक श्री.गितेश बांगडे सर तसेच अध्यक्ष डॉ. वैभव कारेमोरे, सचिव डॉ. पुनम हुडिया व प्रकल्प समन्वयक श्री सतीन अंकलू सर यांचे मौलाचे मार्गदर्शनात तंबाखू मुक्त अभियान राबविण्यात येत आहे.
मुख्याध्यापक श्री व्ही. जी. चाचरकर ,कु.शुभांगी ढवळे अधिक्षिका व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते