ताज्या घडामोडी

झरी येथे चार रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ

जिल्हा प्रतिनीधी:अहमद अन्सारी परभणी

झरी येथे आमदार फंडातून व दादासाहेब टेंगसे यांच्या जि.प. निधीतून होत असलेल्या चार रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ आ. बाबाजानी साहेब, प्रेरणाताई वरपूडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आ. बाबाजानी साहेबांच्या विशेष निधीतून दोन रस्ते व एका रस्ते मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला. तर आ. सुरेश वरपूडकर साहेबांच्या निधीतुन एका रस्त्याच्या कामाचे उद्घाटन यावेळी आम्हा सर्वांच्या हस्ते पार पडले.
“झरी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. इथल्या विकासकामांच्या बाबतीत विविध सूचना रहिवाश्यांनी कराव्यात. त्यांची पूर्तता केली जाईल..” असा शब्द यावेळी बोलताना आ. बाबाजानी साहेबांनी दिला. यावेळी त्यांनी कॅनॉलला लागून असलेल्या झरी गावात येणाऱ्या रस्त्याबाबत ते विधानसभा आमदार झाल्यानंतर काही दिवसांत अतिशय खोल असलेली पांदण कशी भरून काढली, याची आठवण काढली.
मागील काळात दादासाहेब टेंगसे यांनी याठिकाणी अनेक विकासकामे केली. यापुढेही आ. बाबाजानी साहेब, आ. सुरेश वरपूडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विविध माध्यमातून झरी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू,” असे अभिवचन दादासाहेब टेंगसे यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते गंगाधररावअण्णा गायकवाड, अनिलभाऊ नखाते, चक्रधरराव उगले, सुभाषआबा कोह्ल्हे, माधवराव जोगदंड, पं.स. सभापती सदाशिव थोरात, विश्वंभर साळवे, दगडोबा पटने, शिवाजी नायकल, नितीन शिंदे आदींची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close