चिमुर मधील अतिक्रमण धारकाना पट्टे द्या – डार्विन कोब्रा
ग्रामिण प्रतिनिधी : विलास दिघोरे
भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यानां निवेदनाद्वारे गरजू इंदिरानगर वासीयांना स्थायी पट्टे द्या अशी मागणी केली.मौजा चिमुर येथील इंदिरा नगर वासीयांना शासनाकडून सन 1975 ते 1980 चे दरम्यान घरकुल वाटपात 1 ते 113 मकान गरजूना मिळालेले असून त्यांची नोंद सातबारा रेकार्डला नमूद आहे. तसेच ख. नं. 143 च्या शिल्लक जागेवर इतर इतर गरजू लोंकानी 20-25 वर्षापासुन अतिक्रमण करून राहत आहेत. स्थायी पट्टे मिळावेत यासाठी इंदिरानगर वासीयांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला पंरतु अजूनपर्यंत इंदिरानगर वासीयांना प्लाटचे मोजमाप करून जागेचे पट्टे देण्याची कार्यवाही शासनाने केलेली नाही त्यामुळे इंदिरानगर वासीयांवर अन्याय झालेला आहे असा आरोप भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विनकोब्रा यानी केला व तात्काळ जागेचे स्थायी पट्टे देण्यात यावे आणि विना अट घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी उपविभागीय अधिकारी यानां निवेदनाद्वारे करण्यात आली चिमूर येथील इंदिरा नगरवासियांना स्थायी पट्टे न मिळाल्यास भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या वतीने उग्र ठिय्या आंदोलन करू असा इशारा डार्विनकोब्रा यानी दिला.यावेळी भारतीय क्रांतिकारी संघटनेचे उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा, राजू अलोने, डॉ. देव, अरविंद अंबादे, कैलाश भोयर, सचिन लभाने, सुधाकर बोरकर इत्यादि उपस्थित होते.