ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दुपारी 3.30 पर्यंत 52.98 टक्के मतदान
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी, दि. 02/12(2025 नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील पूर्णा, गंगाखेड, सेलू, पाथरी, मानवत, जिंतूर आणि सोनपेठ नगरपरिषद निवडणूकीसाठी मतदारांचा मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुपारी 3.30 पर्यंत एकूण सरासरी 52.98 टक्के मतदान झाले.
दुपारी 3.30 वाजेपर्यंत जिल्ह्यातील नगरपरिषदनिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. पूर्णा – 47.2 टक्के, गंगाखेड – 48.3 टक्के, सेलू- 51.37 टक्के, पाथरी – 58.65 टक्के, मानवत – 49.3 टक्के, जिंतूर – 58.28 टक्के आणि सोनपेठ – 62.45 असे एकूण परभणी जिल्ह्यात सरासरी 52.98 टक्के मतदान झाले.









