पाथरी-वाघाळा मार्गे अंबेजोगाई बस सेवा सुरू

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
वाघाळा गावचे युवा सरपंच ज्यांनी सहा महिण्या पुर्वी गावकारभाराची सुत्रे हाती घेतली आणि समाजमनावर अधिराज्य करायला सुरूवात केली ते सरपंच बंटी पाटील यांनी ग्रामस्थांच्या आरोग्यसेवेसी निगडीत असलेल्या बस सेवे साठी मागिल काही दिवसा पासुन प्रयत्नरत होते.सोमवारी पाथरी आगाराने पाथरी वाघाळा मार्गे अंबेजोगाई बस सेवा सुरू केली.
या भागातील जनतेची मागणी असल्याने पाथरी अंबेजोगाई बस सेवा सुरू करण्या साठी सरपंच बंटी पाटील यांचे आ बाबाजानी दुर्रानी यांच्या मार्फत सतत प्रयत्न होते.याला पाथरी आगाराने सकारात्मक प्रतिसाद देत आज श्रावणाच्या दुस-या सोमवारी पहिल्या फेरीला सुरूवात केली. पाथरी वाघाळा मार्गे अंबेजोगाई ही बस पाथरीतुन सकाळी ७:३० दुपारी १:३० अशा वेळेला सुटेल या मुळे. अंबेजोगाई येथे वैद्यकीय उपचार आणि श्रीक्षेत्र मुदगलेश्वर, परळी वैजनाथ,सोनपेठ, बीड,लातुर कडे जाणा-या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. आज या फेरीचा प्रारंभ पाथरी बस आगाराने केला.या वेळी सरपंच बंटी पाटील,मुदगल चे सरपंच केंद्रे मदनराव घुंबरे,भागवत घुंबरे आणि ग्रामस्थांनी चालक निळकंठ दत्तात्रय मुरलीधर, वाहक सावता हरीभाऊ गोरे, वाहतुक नियंत्रक प्रल्हाद दत्तराव सुरवसे यांचा सत्कार केला आणि आगराच्या बस ला पुष्पहार घालून पुजन केले. या वेळी डॉ मधूकर घुंबरे,जनार्धनराव घुंबरे,जुगलजी मुुंदडा,दत्ता लोणीकर,राजेभाऊ घुंबरे,राजेभाउ लोणीकर,तुकारम टरपले शेषराव घुंबरे मुकदम,रघूनाथ अंबुरे,राम कदम आर्वीकर, संदिपान शिंदे आणि वाघाळा ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.